शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आपल्या दारी जोड.. ५

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

नाल्यावर ढापे बसवावेत...

नाल्यावर ढापे बसवावेत...
अनेक ठिकाणी नाल्या उघड्या आहेत. मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यावर ढापे नाहीत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. शिवाय नालीत पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सिडको प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे अगोदर नाल्यावर ढापे बसवावेत, असे विष्णू जाधव यांनी सांगितले.
विकासकामे नाहीत...
नागरिक तक्रारी घेऊन गेल्यास सिडको प्रशासन प्रत्येक वेळी नुसते आश्वासन देते; परंतु करीत काहीच नाही. सिडको प्रशासनाकडून सध्या कोणतीच विकासकामे केली जात नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असा आरोप यशवंत चौधरी यांनी केला आहे.
फवारणीवाले पैसे मागतात...
अस्वच्छतेमुळे डास व दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. सिडको प्रशासन औषध फवारणी करीत नाही. एखाद्या वेळी औषध फवारणी आलीच तर फवारणीवाले नागरिकांनाच पैसे मागतात. पैसे दिल्याशिवाय औषध फवारणी होत नाही, असा आरोप अनुराधा चव्हाण यांनी केला आहे.
कचराकुंड्या नाहीत...
कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्याच नाहीत. त्यामुळे नागरिक उघड्यावरच रस्त्याच्या कडेला अथवा मोकळ्या जागेवर कचरा टाकतात. कचरा उचलला जात नसल्यामुळे तो अनेक दिवस तसाच रस्त्यावर पडून राहतो, असे रंजना चौधरी यांचे म्हणणे आहे.
विद्युत डीपी उघड्या....
अनेक भागातील विद्युत डीपी उघड्या आहेत. विद्युत डीपीला कुलूप व संरक्षक जाळी लावलेली नाही. विद्युत वायर लोंबकळले आहे. त्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा सांगूनही याकडे कोणी लक्ष देत नाही, असे मनीषा देसाई यांनी सांगितले.
पथदिवे सुरू करावेत...
सिडको ग्रोथ सेंटर भागातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. रात्रीला गस्त होत नाही. त्यामुळे चोर्‍या होत आहेत. प्रशासनाने किमान रस्त्यांवरील पथदिवे तरी सुरू करावेत, अशी मागणी रमाबाई इंगोले यांची आहे.
गार्डन कायम बंद...
नागरिकांना बसण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले सिडको ग्रोथ सेंटर भागातील गार्डन मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे लहान मुलांचा हिरमोड होत आहे. येथे सुरक्षारक्षकही नाही. गार्डन कायम बंद ठेवायचे असेल तर कशाला केले, असा मथुरा चव्हाण यांचा प्रश्न आहे.
(जोड आहे)