शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने घातला कोट्यावधींचा गंडा

By admin | Updated: March 22, 2015 19:22 IST

कोलकाता येथील कंपनीस दहा पट पैशांचे आमीष दाखवत नऊ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला लावणे अभिनेत्री शिल्पा शेट्टीला चांगलेच महागात पडले आहे.

ऑनलाइन लोकमत 
कोलकाता, दि. २२ - कोलकाता येथील कंपनीस दहा पट पैशांचे आमीष दाखवत नऊ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला लावणे अभिनेत्री शिल्पा शेट्टीला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी व रिपू सदन कुंद्रा यांच्याविरोधात कोलकाता पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
अभिनेत्री शिल्पा शेट्टी व रिपू सदन कुंद्रा यांच्या इसेंशिअल स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने कोलकाता येथील एम के मिडीया प्रायव्हेट लिमीटेड  कंपनीला दोन वर्षात १० पट परतावा मिळेल असे आमीष दाखवत त्यांना नऊ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला सांगितले. यानुसार एम के मिडीयाने शिल्पा शेट्टी यांच्या कंपनीत गुंतवणूकही केली. या व्यवहारानंतर शिल्पा शेट्टी यांच्या कंपनीने इएसपीएलचे ३० लाख रुपयांचे इक्विटी शेअर्सही दिले होते. मात्र काही महिन्यांनी हा सर्व प्रकार बोगस असून इक्विटी शेअर्सही बोगस असल्याचे कंपनीच्या लक्षात आले.  याप्रकरणी एम के मिडीयाचे प्रतिनिधी देबाशीष गुहा यांनी कोलकाता येथील हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.  आर्थिक फसवणूक, कट रचणे अशा विविध कलमांखाली शिल्पा शेट्टींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिल्पा शेट्टी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.