शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शरद पवार यांना थप्पड मारणारा आरोपी 8 वर्षे होता बेपत्ता; दिल्ली पोलिसांकडून पुन्हा अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 3:25 PM

दिल्लीमध्ये ही घटना घडली होती. त्याला तेव्हाच ताब्यात घेण्यात आले होते.

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रात किंगमेकर ठरलेले शरद पवार यांना 2011 मध्ये एका कार्यक्रमावेळी एका व्यक्तीने थप्पड लगावली होती. या व्यक्तीला तब्बल 8 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. अरविंदर सिंग याने पवारांना थप्पड लगावली होती. 

दिल्लीमध्ये ही घटना घडली होती. त्याला तेव्हाच ताब्यात घेण्यात आले होते. खटल्यादरम्यान 2014 मध्ये त्याला दिल्लीच्या न्यायालयाने फरार घोषित केले होते. अरविंदरला हरविंदर या नावानेही ओळखले जाते. दिल्ली पोलिसांनी अरविंदरला अटक केल्यानंतर सुटकेचा श्वास घेतला आहे. कारण ते गेली 8 वर्षे आरोपीला शोधत होते. 

वृत्तसंस्थेनुसार अटक केल्यानंतर तो कोठडीतून पळाला होता. शोधूनही न सापडल्याने त्याला दिल्लीच्या न्यायालयाने 2014 मध्ये फरारी घोषित करण्यात आले होते. शरद पवार 2011 मध्ये कृषीमंत्री होते. दिल्लीतील इफ्कोच्या एका कार्यक्रमात त्यांच्याबाबत हा प्रकार घडला होता. आरोपी अरविंदर याने पवारांच्या गालावर थप्पड लगावली होती. पवार तेव्हा बाहेर पडत होते. अचानक झालेल्या हल्ल्याने शरद पवारही तोल गेल्याने खाली पडता पडता वाचले होते. 

या हल्ल्यानंतर संसद मार्गावरील या ऑडिटोरियमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अरविंदरला पकडले होते आणि पोलिसांच्या ताब्यात दिले होते. हल्लेखोर अरविंदर हा एक वाहतूकदार होता. पवार यांनी त्याच्या या कृत्याला भ्याडपणा म्हटले होते. तर अरविंदर याने हे सर्व भ्रष्ट असल्याने थप्पड मारण्यासाठी आल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdelhiदिल्लीCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार