शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

विकलांगास रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला

By admin | Updated: March 8, 2015 01:30 IST

एका मानवाधिकार कार्यकर्त्यास तो विकलांग असल्यामुळे दक्षिण दिल्लीच्या महागड्या बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना उघडकीस आली

अन्याय : मानवाधिकार कार्यकर्त्यांची नाराजी; जबाबदार लोकांवर कारवाईची मागणीनवी दिल्ली : एका मानवाधिकार कार्यकर्त्यास तो विकलांग असल्यामुळे दक्षिण दिल्लीच्या महागड्या बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल शनिवारी तीव्र नाराजी जाहीर केली.पक्षपाताचे बळी ठरलेले निपुण मल्होत्रा हे निपमान फाऊंडेशनचे सहसंस्थापक असून, जन्मजात अर्थोग्राइपोसिस नामक दुर्लभ आजाराने पीडित आहेत. सदर रेस्टॉरंटचा सुरक्षा जवान आणि व्यवस्थापकाने त्यांना शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याने आपल्याला आत जाता येणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. स्वत: मल्होत्रा यांनी त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती देताना सांगितले की, माझ्या मित्रांनी रात्रीच्या जेवणासाठी केया येथे जाण्याचा निर्णय घेतला होता. माझे नऊ मित्र रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. आमचा एक मित्र व्हीलचेअरवर येईल तेव्हा तो टेबलपर्यत पोहोचेल याची काळजी घ्यावी, अशी विनंती केली होती. तेव्हा अपंगांना प्रवेश न देण्याचे रेस्टॉरंटचे धोरण असल्याचे कारण पुढे करून त्यांनी मला प्रवेश नाकारला. (लोकमत न्यूज नेटवर्क)होळीमुळे दरवाजावर काही मद्यधुंद लोक उभे होते. त्यामुळे काळजी म्हणून आम्ही ठराविक संख्येतच लोकांना आत प्रवेश देत होतो. निपुण यांच्यासोबत आणखी दोन मुले होती. त्यांना आत जाण्याची परवानगी दिली असती तर आतील पुरुषांची संख्या वाढली असती. त्यामुळे एकट्या पुरुषाला आत प्रवेश नाही, असे आम्ही सांगितले. - प्रेमजितकुमार, रेस्टॉरंटचे महाव्यवस्थापक