अभिजित कोळपे बातमी : प्रथम पातळीतून एकूण ४८ जणांची निवड

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:21+5:302015-02-14T23:52:21+5:30

विद्यार्थ्यांचा सत्कार : द चेंज फाउंडेशनतर्फे ब्रेनोवेंशन टॅलेंट सर्च परीक्षा

Abhijit Kollapa News: A total of 48 people selected from the first level | अभिजित कोळपे बातमी : प्रथम पातळीतून एकूण ४८ जणांची निवड

अभिजित कोळपे बातमी : प्रथम पातळीतून एकूण ४८ जणांची निवड

द्यार्थ्यांचा सत्कार : द चेंज फाउंडेशनतर्फे ब्रेनोवेंशन टॅलेंट सर्च परीक्षा
चाकण : द चेंज फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या ब्रेनोवेंशन टॅलेंट सर्च या परीक्षेचा वार्षिक पारितोषिक समारंभ खराबवाडी येथील प्राथमिक शाळेत झाला. विद्यार्थ्यांचा मूलभूत आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त गुण शोधण्यासाठी ब्रेनोवेंशन टॅलेंट सर्च २०१४-१५ ही परीक्षा फाउंडेशनतर्फे येथे घेण्यात आली. चाकणमधील १० शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रथम पातळीतून एकूण ४८ जणांची निवड करण्यात आली.
या वेळी आयडिया फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा पिल्लई, द चेंज फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप वानखेडे, अमिता नायगावकर, सरपंच योजना सोमवंशी, राजेंद्र कड, काळूराम केसवड, कांताराम कड, मंगल देवकर, संगीता खराबी, मुख्याध्यापक हरिभाऊ खोडदे, सर्व शिक्षक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. परीक्षेची काठिण्य पातळी वाढवून दुसर्‍या पातळीमधून एकूण १५ मुले यशस्वी ठरली. यशस्वी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोट बुक सेट, डिक्शनरी, कंपास बॉक्स आदी बक्षिसे देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या अभ्यास पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी अशा परीक्षा समाजाच्या तळागाळात घेणे आणि विद्यार्थ्यांचा पायाभूत विकास करण्यासाठी विविध उपक्रम चालविणे ही काळाची गरज बनत चालली आहे, अशी भावना संदीप वानखेडे यांनी या वेळी व्यक्त केली.
(चौकट)
अनुक्रमे १ ते ३ क्रमांकांचे विद्यार्थी व शाळा पुढीलप्रमाणे :
६वी- सिद्धी कड, ओंकार झोळ, प्रतीक्षा दीक्षित (सर्व नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी).
७वी- योगेश्वरी राठोड (जि.प. शाळा खराबवाडी), आम्रपाली जगताप (जि.प. चाकण), सिद्धी जाधव (जि.प. आगरवाडी).
८वी- कोमल बुरसे (कन्या विद्यालय चाकण), आकाश कड, सौरभ ढवळे (दोघेही नवमहाराष्ट्र).
९वी- राहुल दीक्षित (नवमहाराष्ट्र), ऋतुजा पवळे, पूजा ठोंबरे (दोन्ही कन्या विद्यालय).
१०वी- प्रताप नरसाळे, प्रसाद भोते, प्रफुल्ल बोत्रे (तिघेही नवमहाराष्ट्र विद्यालय) या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

फोटो ओळ : ब्रेनोवेंशन टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व मान्यवर.
०००

Web Title: Abhijit Kollapa News: A total of 48 people selected from the first level