अभिजित कोळपे बातमी : माळशिरसमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:08+5:302015-02-14T23:52:08+5:30

भीतीचे वातावरण : बंदोबस्त करण्याची मागणी

Abhijit Kollapa News: In Malshiras, a full fledged thief has been arrested | अभिजित कोळपे बातमी : माळशिरसमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट

अभिजित कोळपे बातमी : माळशिरसमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट

तीचे वातावरण : बंदोबस्त करण्याची मागणी
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे काल रात्री तीन घरांची कुलपे तोडून माळशिरस-यवत रस्त्यावरील शिवशंभो ढाब्यावरही चोरट्यांनी चोरी केली.
शुक्रवारी रात्री साहेबराव दत्तात्रय गद्रे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन कपाटे उचकटून टाकली; तसेच कपडे अस्ताव्यस्त टाकले. शेजारील घराला सुगावा लागू नये, म्हणून बाळासाहेब दत्तात्रय गद्रे यांच्या दरवाजाची कडी लावली. त्याचप्रमाणे गोधाबाई शेंडगे यांच्याही घराचे कुलूप तोडून भांडी, स्पिकर, मशीन नेण्यात आली.
माळशिरस-यवत रस्त्यावरील शिवशंभो ढाब्यावरही तीन हजार व महागडा मोबाइल चोरून नेला. माळशिरस-पोंढे रस्त्यावरील दोरगे यांच्या घराची चोरी करण्यात आली. जगतापवस्तीवरील जमिनीवरील ट्रान्स्फॉर्मर फोडण्यात आले. एकंदरीत तीन घरेही बंद होती. तिथेच चोरी करण्यात आली. यात फारशी हानी झाली नाही. गेल्या आठवड्यात हरी रामचंद्र ताम्हाणे यांची पल्सर मोटारसायकल दारासमोर उभी असताना चोरून नेली. ती आजतागायत मिळाली नाही. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण तयार आहे .

फोटो ओळ : माळशिरस येथे साहेबराव गद्रे यांच्या घरात तोडलेली दोन्ही कपाटे.
०००००

Web Title: Abhijit Kollapa News: In Malshiras, a full fledged thief has been arrested