शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी आघाडी लवकरच अस्तित्वात येणार अभय चौटालांचा दावा : जनतेला पर्याय हवा

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

चंदीगड : भाजपच्या घोडदौडीला लगाम लावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसेतर पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांंना वेग दिला जात आहे. तिसऱ्या आघाडीचा पर्याय मजबूत ठरू शकतो, असा दावा इंडियन नॅशनल लोकदलाच्या(रालोद) राजकीय व्यवहार समितीचे सदस्य तथा हरियाणातील ऐलनाबादचे आमदार अभयसिंग चौटाला यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत लवकरच तिसरी आघाडी स्थापन होईल. तिसऱ्या आघाडीला मूर्त रूप देण्याची प्रक्रिया सुरू होताच या आघाडीत सहभागी होणारा रालोद हा पहिला पक्ष असेल, असेही ते म्हणाले.

चंदीगड : भाजपच्या घोडदौडीला लगाम लावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसेतर पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांंना वेग दिला जात आहे. तिसऱ्या आघाडीचा पर्याय मजबूत ठरू शकतो, असा दावा इंडियन नॅशनल लोकदलाच्या(रालोद) राजकीय व्यवहार समितीचे सदस्य तथा हरियाणातील ऐलनाबादचे आमदार अभयसिंग चौटाला यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत लवकरच तिसरी आघाडी स्थापन होईल. तिसऱ्या आघाडीला मूर्त रूप देण्याची प्रक्रिया सुरू होताच या आघाडीत सहभागी होणारा रालोद हा पहिला पक्ष असेल, असेही ते म्हणाले.
लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, शरद यादव आणि मुलायमसिंगसारखे नेते तसेच अनेक राजकीय पक्ष आणि पूर्वाश्रमीच्या जनता दल परिवारातील सर्व घटकांचा त्यात समावेश असेल. बीजू जनता दलासह आणखी तीन पक्षही सहभागी होऊ शकतात.
------------------------
जनता माफ करणार नाही
जनतेला भाजप आणि काँग्रेसच्या सरकारांचा वीट आला असून तिसरी आघाडी स्थापन न झाल्यास जनता आम्हाला माफ करणार नाही. लोकांना तिसरा पर्याय हवा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तिसऱ्या आघाडीत नेतृत्वाच्या मुद्यावर मतभेद असल्याचा त्यांनी इन्कार केला. सर्व एकत्र बसून नेतृत्वाबाबत विचार करतील, असे ते म्हणाले.