शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’वाद झाला अधिकृत

By admin | Updated: March 10, 2015 23:43 IST

आम आदमी पार्टीतील अंतर्गत मतभेद विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्यासह

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील अंतर्गत मतभेद विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्यासह पक्षाचा पराभव व्हावा यासाठीच भूषण पिता- पुत्र (शांती भूषण- प्रशांत भूषण) व योगेंद्र यादव काम करीत होते, असा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे. त्यांचे पहिले अधिकृत निवेदन मंगळवारी जारी केले.आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने प्रशांत भूषण व यादव यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) हकालपट्टी केल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, वाहतूक मंत्री गोपाल राय, सरचिटणीस पंकज गुप्ता आणि संजय सिंग यांनी या निर्णयाचे समर्थन केले.‘‘या तिघांनी, विशेषत: प्रशांत भूषण यांनी बाहेरील राज्यांतून प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी मी पक्षाचा प्रचार करणार नाही, तुम्हीही करू नका. पराभव झाला तरच केजरीवालांना थोडी समज येईल, असे धक्कादायक विधान केले होते. पक्षाला कुणी निधी देत असेल तर तोही थांबवावा,’’ असे भूषण यांनी आपच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया यांच्या व म्हैसूरच्या कार्यकर्त्यांसमक्ष म्हटल्याचा उल्लेख सिसोदिया व इतरांनी निवेदनात केला.या तिघांची पक्षाच्या राष्ट्रीय संयोजक पदावरून केजरीवाल यांना हटविण्याची इच्छा होती. निवडणुकीच्या दोन आठवडे आधी आशिष खेतान यांनी प्रशांत भूषण यांना फोन करून दिल्लीतील चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केला असता प्रशांत भूषण यांनी पक्ष पराभूत व्हावा, केवळ २० ते २२ जागा मिळाल्यास केजरीवालांना समज येईल असे विधान केले होते. भाजपने जोरदार प्रचार चालविला असता आपचे ज्येष्ठ नेते या तिघांची समजूत घालण्यात अमूल्य वेळ वाया घालवत होते, अशी माहिती या निवेदनात दिली आहे. यादव यांनी काही ध्वनिमुद्रित माहिती देऊन केजरीवालांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न केला. शांती भूषण यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांना केवळ समर्थनच दिले नाही, तर आपमधून बाहेर पडलेल्या स्वयंसेवी विचार मंचालाही उघड उघड पाठिंबा दिला. मतदानाच्या काही दिवस आधी शांती भूषण यांनी केजरीवालांपेक्षा बेदी अधिक विश्वसनीय असल्याचे विधान केले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्याबाबत विचारणा चालविली होती. शांती भूषण यांनी केजरीवालविरोधी विधानांचा सपाटाच लावला होता, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले आहे. पीएसीमधून वगळण्याचा निर्णय बेजबाबदार आणि लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप या तिघांनी केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)