दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 05:58 IST2026-05-05T05:58:19+5:302026-05-05T05:58:50+5:30

तामिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) ने  सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करताना, आम आदमी पार्टी, आसाम गण परिषद आणि तेलुगू देसम पार्टी यांसारख्या पक्षांच्या पावलावर पाऊल टाकले आहे.

A rare 'political startup' that became a 'unicorn'! Very few parties in the country have become successful in a short period of time | दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी

दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी

नवी दिल्ली : अभिनेता-राजकारणी विजयच्या टीव्हीके पक्षाने निवडणुकीच्या मैदानात केलेल्या जबरदस्त पदार्पणामुळे राजकीय 'स्टार्टअप्स' पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. यापैकी फारच कमी 'स्टार्टअप्स'ना अल्पावधीतच 'युनिकॉर्न' (अत्यंत यशस्वी) बनणे शक्य झाले आहे.

ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”

तामिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) ने  सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करताना, आम आदमी पार्टी, आसाम गण परिषद आणि तेलुगू देसम पार्टी यांसारख्या पक्षांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. आपने २०१३ मधील आपल्या पहिल्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते, तर एजीपीने १९८५ मध्ये, पक्षाच्या स्थापनेनंतर लगेचच, 'आसाम आंदोलना'शी संबंधित यशस्वी अपक्ष उमेदवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. टीडीपीने आपल्या स्थापनेच्या अवघ्या एका वर्षानंतर, १९८३ मध्ये आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०१ जागा जिंकत प्रचंड बहुमताने दणदणीत विजय मिळवला होता. तथापि, फारच कमी राजकीय 'स्टार्टअप्स'ना 'युनिकॉर्न' बनणे जमले आहे; काहींना यश मिळण्यास वेळ लागला, तर काही पक्ष छाप पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले.

ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”

अनेकांना का अपयश?

अगदी गेल्याच वर्षी, 'जन सुराज' या पक्षाला दारुण अपयशाला सामोरे जावे लागले. एक उदाहरण म्हणजे अभिनेता-राजकारणी कमल हासन यांचा 'मक्कल निधी मय्यम' हा पक्ष, ज्याला २०२१ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही.

बिहारमध्ये अनेक स्टार्टअप

बिहारमध्ये अनेक छोटे 'स्टार्टअप' पक्ष कार्यरत आहेत; उदाहरणार्थ, पुष्पम प्रिया चौधरी यांच्या नेतृत्वात 'प्लुरल्स' पक्ष आहे. काही असेही छोटे पक्ष आहेत ज्यांच्या महत्त्वाकांक्षा मर्यादित आहेत आणि जे केवळ विशिष्ट भागांतच आपला प्रभाव टिकवून आहेत.

यात जीतन राम मांझी यांचा 'हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर)' आणि उपेंद्र कुशवाह यांचा 'राष्ट्रीय लोक मोर्चा' यांचा समावेश होतो. उत्तर प्रदेशमध्ये निषाद पक्ष, 'पीस पार्टी', 'अपना दल (सोनेलाल)' आणि 'सुहेलदेव भारतीय समाज पक्ष' यांसारखे पक्ष अस्तित्वात आहेत.

Web Title : दुर्लभ राजनीतिक स्टार्टअप बना यूनिकॉर्न; कुछ ही भारतीय दल सफल।

Web Summary : अभिनेता विजय की पार्टी से राजनीतिक स्टार्टअप की चर्चा। आप और टीडीपी जैसे कुछ दलों को तेजी से सफलता मिली। जन सुराज जैसे कई विफल रहे। बिहार, उत्तर प्रदेश में कई छोटे दल सीमित प्रभाव के साथ मौजूद हैं।

Web Title : Rare political startup becomes unicorn; few Indian parties succeed quickly.

Web Summary : Actor Vijay's party sparks political startup buzz. Some, like AAP and TDP, achieved rapid success. Many fail, like Jan Suraj. Numerous small parties exist in states like Bihar and Uttar Pradesh, with limited impact.