शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

हायवे अपघातात बिबट्या ठार झाल्याचा पोलिसांना कॉल; तपासणीअंती निघाला चित्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 10:39 IST

जंगलातील वन्य प्राण्यांपैकी एक असलेला चित्ता हा भारतात अतिशय दुर्मिळ प्राणी मानला जातो

नवी दिल्ली - माणसांनी सिमेंटची जंगलं वाढवल्याने वन्य प्राणी माणसांच्या वस्तीत, मानवी रहिवाशी परिसरात येत असल्याचं आढळून येत आहे. कधीकाळी जंगलात दिसणारा बिबट्या आता कुणाच्या शेतात, कुणाच्या गावात, कुणाच्या वस्तीत आढळून आल्याच्या बातम्या अनेकदा माध्यमातून समोर आल्या आहेत. त्यामुळे, बिबट्या आढळून येणं ही नवीन घटना राहिलीच नाही. तर, काहीवेळा मानवी वस्तीत दहशत पसरवणाऱ्या बिबट्यांना वन विभागाने पकडूनही नेल्याचे प्रसंग घडले आहेत. मात्र, दिल्लीतील एका महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पण, तपासणीअंती तो चित्ता असल्याचे निष्पण्ण झाले. 

जंगलातील वन्य प्राण्यांपैकी एक असलेला चित्ता हा भारतात अतिशय दुर्मिळ प्राणी मानला जातो. म्हणूनच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधता द. आफ्रिकेच्या नामीबियातून भारतात चित्ते आणण्यात आले होते भारता आणण्यात आलेल्या चित्त्यापैकी ८ चित्त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र, आता राजधानी दिल्लीजवळील एका महामार्गावर वाहनाच्या धडकेत चित्ता ठार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक फोन आला. त्यानुसार, येथील महामार्गावर बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर, पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. 

अलीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खातुश्याम मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर हा चित्ता मृतावस्थेत पडला होता. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, तो बिबट्या नसून चित्ता असल्याचे लक्षात आले असून बॉडी ताब्यात घेतली. तसेच, संबंधित वन विभागालाही पाचारण करण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. 

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तो बिबट्या नसून जॅग्वार म्हणजेच चित्ता असल्याचं उघडकीस आलं आहे. मात्र, चित्ता हा भारतात दुर्मिळ असतानाही येथील भागात कुठून आला आणि इथपर्यंत कसा पोहोचला याची चर्चा होत आहे.  दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात १२ चित्ते आणण्यात आले होते. त्यापैकी ८ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. 

मध्य प्रदेशात कुनो पार्कमधील चित्ता प्रोजेक्ट हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून नामीबियातून आण्यात आलेल्या चित्त्यांना याच पार्कमध्ये सोडून देण्यात आले होते. १७ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नामीबियातून आणलेल्या चित्त्यांना याच कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडलं होतं.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गleopardबिबट्याdelhiदिल्लीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश