शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

900 वर्षे चाललेल्या दुष्काळामुळे सिंधु संस्कृतीचा विनाश- आयआयटी खरगपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 17:42 IST

ही संस्कृती 4350 वर्षांपूर्वीच नष्ट झाली आहे.

खरगपूर- जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असणाऱ्या सिंधु संस्कृती लयाला जाण्याची कारणे आजही शोधली जात आहेत. या संस्कृीताचा नाश 900 वर्षे चाललेल्या एका दुष्काळामुळे झाला असे आयआयटी खरगपूरच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ही संस्कृती 4350 वर्षांपूर्वीच नष्ट झाली आहे. आयआयटी खरगपूरचे हे संशोधन एल्सवियरच्या शोधनियतकालिकामध्ये प्रकाशित होणार आहे.भूगर्भशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्राच्या तज्ज्ञांनी केलेल्या या अभ्यासात सुमारे 5000 वर्षांपुर्वीच्या या प्रगत संस्कृतीला मान्सूनच्या अनियमिततेची झळ बसली असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सलग 900 वर्षे अत्यंत अपुरा पाऊस पडल्यामुळे सिंधु संस्कृती ज्या नद्यांवर अवलंबून होती त्या नद्यां कोरड्या पडल्या. या दुष्काळाचा परिणाम सिंधु संस्कृतीतील लोक आणि प्राणी नष्ट होण्यावर झाला.आयआयटी खरगपूरच्या भूगर्भशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि या संशोधनातील मुख्य संशोधक अनिल कुमार गुप्ता यांनी याबद्दल बोलताना सांगितले,'' आम्ही केलेल्या अभ्यासातून ख्रिस्तपूर्व 2350 (4350 वर्षांपुर्वी) ते ख्रिस्तपूर्व 1450 या काळामध्ये मान्सूनने ओढ दिल्याने मोठा दुष्काळ सिंधु संस्कृतीच्या परिसरामध्ये पडला. लोकांना आपली जागा सोडून जावे लागले असे निष्कर्ष निघत आहेत. हे लोक गंगा-यमुना नद्यांच्या खोऱ्याकडे तसेच पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, मध्यप्रदेश आणि दक्षिणेस विंध्याचल व दक्षिण गुजरातकडे सरकले असावेत." 

टॅग्स :droughtदुष्काळIndiaभारत