शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
4
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
5
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
6
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
7
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
8
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
9
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
10
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
13
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
14
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
15
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
16
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
17
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
18
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
19
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
20
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
Daily Top 2Weekly Top 5

२८... गुमथळा

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

गुमथळा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

गुमथळा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
नागरिकांत भीती : बकऱ्या चोरीचे प्रमाण वाढले
गुमथळा : कामठी तालुुक्यातील गुमथळा परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: गावातील बकऱ्या चोरून नेल्या जात असल्याने नागरिकांत भीतीचे वातारवण निर्माण झाले आहे.
परिसरातील सोनेगाव येथे दोन दिवसांपूर्वी पाच घरून चोरट्यांनी बकऱ्या लंपास केल्या. दरम्यान, एका ठिकाणाहून चोरट्यांनी महिलेच्या हातून बकरी हिसकावून नेली. लिहिगाव, सावळी येथेही बकऱ्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या परिसरातील गरीब नागरिक बकरीपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. या परिसरातील काही गावे मौदा आणि काही गावे कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. सदर दोन्ही शहरे दूर असल्याने तसेच फिर्यादीकडे कुठलेही वाहन नसल्याने चोरीच्या घटनांची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्याची तसदी येथील ग्रामस्थ घेत नाही.
चोरट्यांनी भरदिवसा चारायला नेलेल्या बकऱ्या लंपास केल्याची माहिती काही गुराख्यांनी दिली. चोरांची टोळी चारचाकी वाहनातून गावात येतात. प्रसंगी चाकूचा धाक दाखवितात आणि बकऱ्या वाहनात टाकून चोरून नेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. नागपूर-भंडारा महामार्गावरील सावळी येथे काही स्थानिक तरुणांनी पानटपरी सुरू केली. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री या ठिकाणी असलेल्या रूपेश हिवरकर व मुरलीधर वरठी यांच्या दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. यात चोरट्यांनी अंदाजे २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती मुरलीधरने दिली.
येथून जवळच असलेल्या गोदामातून चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी लोखंड चोरून नेले. या प्रकरणी रमेश टिचकुले यांनी फोनवर मौदा पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप टिचुकले यांनी केला. मौदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवूनही पोलीस किरकोळ गुन्ह्यांच्या तपासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात गस्त सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य कुंदा आमधरे यांच्यासह गुमथळा, सोनेगाव, सावळी व परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
***