शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रामदेव बाबा म्हणतात, 23 मे मोदी दिन म्हणून साजरा व्हावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 20:32 IST

रामदेव बाबांकडून मोदींचं तोंडभरुन कौतुक

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजपानं केंद्रातील सत्ता कायम राखली. 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपानं देदीप्यमान विजय मिळवत इतिहास घडवला. त्यामुळे 23 मे रोजी मोदी दिवस साजरा व्हावा, असं मत योगगुरु रामदेव बाबांनी व्यक्त केलं. 23 मे हा ऐतिहासिक दिवस असून तो कायम लक्षात राहावा यासाठी तो मोदी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असं रामदेव बाबा पुढे म्हणाले. 23 मे भारतीय इतिहासातील गौरवशाली दिवस आहे. त्याच दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. मोदी सरकारनं प्रचंड बहुमत मिळवलं, असं रामदेव बाबा म्हणाले. 'देशातील 50 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मोदी, भाजपा आणि एनडीएच्या बाजूनं कौल दिला. त्यामुळे 23 मे हा दिवस भारताच्या राजकारणाच्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे. हा दिवस कायम स्मरणात राहायला हवा. यासाठी तो मोदी दिवस किंवा लोक कल्याण दिवस म्हणून साजरा केला जावा,' असं रामदेव बाबांनी म्हटलं.रामदेव बाबांनी पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. 'एका गरीब घरात, मागासवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या, चहा विकलेल्या नरेंद्र मोदींना संपूर्ण देशाचा पाठिंबा मिळतो, ही बाब ऐतिहासिक आहे. त्यांनी भाजपाला एकहाती 300 हून अधिक जागा मिळवून दिल्या. लोकशाहीच्या दृष्टीनं ही अतिशय मोठी कामगिरी आहे. मोदींवर देवाची कृपा आहे. त्यामुळेच ते देशातील कोट्यवधी लोकांचा विश्वास जिंकू शकले. विरोधकांनी त्यांच्याविरोधात आघाड्या करुनही ते एखाद्या योद्धाप्रमाणे लढले आणि त्यांनी विजय मिळवला,' अशा शब्दांत रामदेव बाबांनी मोदींची प्रशंसा केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBaba Ramdevरामदेव बाबाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा