शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

Coronavirus: आता यांना कुणी सांगायचं? हिंदूराव हॉस्पिटलमधून २३ कोरोनाबाधित पळाले; दिल्लीत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 6:59 PM

एनडीएसीचे महापौर जय प्रकाश यांनी शनिवारी सांगितले की, उत्तर दिल्ली महानगरपालिका संचालित हिंदू राव हॉस्पिटल जे राजधानीत सर्वात मोठं हॉस्पिटल मानलं जातं.

ठळक मुद्दे या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी २५० बेड्स राखीव आहेतदिल्ली सरकारच्या अँपनुसार, या हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नाही असं महापौरांनी सांगितले.या हॉस्पिटलमधून २३ रुग्ण कोणालाही न कळवता १९ एप्रिल ते ६ मे दरम्यान निघून गेलेत

नवी दिल्ली – देशाच्या राजधानी दिल्लीत कोरोना कहर थांबण्याची चिन्हे दिसत नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचसोबत कोरोना संक्रमण रोखण्यासाठी दिल्ली सरकार विविध उपाययोजना करत आहे. परंतु अशातच हिंदू राव हॉस्पिटलमधून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. याठिकाणी कमीत कमी २३ कोरोना बाधित रुग्ण काहीही न सांगता हॉस्पिटलमधून पळाले आहेत.

एनडीएसीचे महापौर जय प्रकाश यांनी शनिवारी सांगितले की, उत्तर दिल्ली महानगरपालिका संचालित हिंदू राव हॉस्पिटल जे राजधानीत सर्वात मोठं हॉस्पिटल मानलं जातं. या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी २५० बेड्स राखीव आहेत. दिल्ली सरकारच्या अँपनुसार, या हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नाही असं महापौरांनी सांगितले.

त्याचसोबत या हॉस्पिटलमधून २३ रुग्ण कोणालाही न कळवता १९ एप्रिल ते ६ मे दरम्यान निघून गेलेत. काही रुग्ण भरती झाल्यानंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता इतरत्र चांगल्या सुविधा मिळत असल्याने निघून जातात. दिल्ली सरकारच्या हॉस्पिटलमध्ये हे होत आहे. हॉस्पिटलमधून २३ रुग्ण पळालेत ते कुठे गेलेत याची कल्पना नाही. मात्र या बाबत दिल्ली पोलिसांना सूचना दिल्याचं महापौरांनी सांगितलं आहे.

ॲडव्हान्स पैसे भरणाऱ्यांनाच दिल्लीत खासगी रुग्णालयात बेड

दिल्लीत गरीब आणि सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात बेड मिळणे अवघड आहे. दिल्लीतील बहुतांश पंचतारांकित रुग्णालयांत रुग्णाची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याच्याकडे लाखो रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स आहे का? या गोष्टी आधी तपासल्या जातात. रुग्णाला भरती केले की मग रुग्णालयाचे मीटर सुरू होते. रुग्ण वाचावा म्हणून नातेवाईकही रुग्णालयातील बिलावर आक्षेप घेत नाहीत.  अनेक रुग्णांकडे हेल्थ इन्शुरन्स असला तरी त्यांना खासगी रुग्णालयात आगाऊ लाखो रुपये भरावे लागतात. शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांना भरती करण्यासाठी लाखो रुपये मागण्यात येत आहेत. खासगी रुग्णालयांसाठी कोणतेही बंधन नसल्याची व्यथा अ‍ॅड. अभय गुप्ता यांनी सांगितली

कोरोना बळींचा आकडा 4200 समीप; चार लाखांहून अधिक रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार (Health Ministry of India) देशात गेल्य़ा 24 तासांत देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 3,18,609 बरे झाले आहेत. खळबळ उडविणारा आकडा हा मृतांचा आहे. देशात गेल्या 24 तासांत 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली