शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

आरबीआयकडून केंद्राला २.११ लाख कोटींचा लाभांश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 08:07 IST

गेल्या वर्षी ८७,४१६ कोटी रुपये लाभांश म्हणून सरकारला हस्तांतरित  केले होते. २०१९ मध्ये सरकारला सुमारे १.८ लाख कोटींचा विक्रमी लाभांश दिला होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी लागू केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये केवळ ३९,६५९ कोटींचा लाभांश दिला होता. 

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने बुधवारी केंद्र सरकारला २०२३-२४ साठी २.११ लाख कोटी रुपयांचा लाभांश देण्यास मान्यता दिली. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ६०८ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आरबीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार हा आतापर्यंतचा विक्रमी लाभांश आहे. 

गेल्या वर्षी ८७,४१६ कोटी रुपये लाभांश म्हणून सरकारला हस्तांतरित  केले होते. २०१९ मध्ये सरकारला सुमारे १.८ लाख कोटींचा विक्रमी लाभांश दिला होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी लागू केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये केवळ ३९,६५९ कोटींचा लाभांश दिला होता. 

मोठ्या लाभांश हस्तांतरणामुळे केंद्रातील निर्गुंतवणुकीची कमतरता भरून काढण्यास मदत होईल. यासोबतच सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्यासही मदत होणार आहे. आरबीआय आपल्या अतिरिक्त उत्पन्नातून सरकारला लाभांश देते. गुंतवणूक आणि डॉलर होल्डिंगवरील मूल्यांकनातील बदलांमधून आरबीआय हा पैसा कमावत असते. 

आतापर्यंत लाभांश दिला?वर्ष      लाभांश २०२३-२४    २,१०,८७४ कोटी २०२२-२३    ८७,४१६ कोटी २०२१-२२    ३०,३०७ कोटी २०२०-२१    ९९,१२२ कोटी २०१९-२०    ५७,१२८ कोटी २०१८-१९    १,७५,९८८ कोटी २०१७-१८    ५०,००० कोटी 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकCentral Governmentकेंद्र सरकारMONEYपैसा