शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

"शुभेंदू अधिकारींनी घरात घुसून हरवलं"; ममता बॅनर्जींच्या पराभवावरून अमित शाहंचा बोचरा वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:22 IST

पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा सुपडा साफ झाला आहे अशा शब्दात गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना सुनावले.

HM Amit Shah on Mamata Banerjee: "ज्याप्रमाणे आम्ही आसाममध्ये पूर्णपणे घुसखोरी  रोखली, त्याचप्रमाणे आता बंगालमध्येही घुसखोरी आणि गो तस्करीवर कायमचा लगाम लावला जाईल," अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना सुनावले. कोलकाता येथे पार पडलेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अमित शाह यांनी शुभेंदू अधिकारी यांची भाजप विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे आगामी मुख्यमंत्री म्हणून अधिकृत घोषणा केली.

ममतांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना हरवले!

अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर बोचरी टीका करताना म्हटले की, "शुभेंदू दांनी ममता बॅनर्जींना त्यांच्या स्वतःच्या घरात (भवानीपूर) जाऊन पराभूत केले आहे. भवानीपूर हा दक्षिण कोलकात्याचा त्यांचा सर्वात मोठा बालेकिल्ला होता, तिथेच दीदींचा सुपडा साफ झाला आहे." २०२१ मध्ये नंदीग्राम आणि आता २०२६ मध्ये भवानीपूर अशा दोन वेगवेगळ्या मतदारसंघांत शुभेंदू यांनी ममतांना मात देऊन आपली ताकद सिद्ध केली आहे.

बंगालमध्ये भाजपला २०७ जागांसह प्रचंड कौल मिळाला आहे. भाजपच्या आमदारांच्या विजयाचे सरासरी अंतर तब्बल २८ हजार मते आहे. राज्यातील २३ पैकी ९ जिल्ह्यांत तृणमूल काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. तर २० जिल्ह्यांत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. १९५० मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पाहिलेले स्वप्न आज त्यांच्या जन्मभूमीत साकार झाले आहे. ते जिथे कुठे असतील, तिथून हे पाहून नक्कीच सुखावले असतील," असे भावूक उद्गार शाह यांनी काढले.

३२१ कार्यकर्त्यांचे बलिदान

हा विजय केवळ सुखद नाही, तर त्यामागे वेदनादायी संघर्ष  आहे. या प्रवासात भाजपच्या ३२१ कार्यकर्त्यांनी आपला जीव गमावला आहे, त्यांना शाह यांनी आदरांजली वाहिली. शाह यांनी स्पष्ट केले की, नवीन सरकार राज्यात कायद्याचे राज्य स्थापन करेल. ममतांच्या काळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले होते, ते आता संपवले जाईल. तसेच ९३ टक्क्यांहून अधिक मतदान होऊनही संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, याबद्दल त्यांनी सुरक्षा दलांचे आणि निवडणूक आयोगाचे अभिनंदन केले.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Suvendu Adhikari defeated Mamata Banerjee in her own stronghold: Shah

Web Summary : Amit Shah claimed Suvendu Adhikari defeated Mamata Banerjee in Bhawanipore. BJP secured a significant win in Bengal, aiming to establish the rule of law and end criminalized politics, honoring sacrificed workers.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Amit Shahअमित शाहBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी