शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षात घेतली कोटींची उडाणे बीएचआर : २४ हजार भागधारक तर १ लाख ४४ हजार नाममात्र सभासद (भाग-१)

By admin | Updated: November 26, 2015 23:58 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेने १९ वर्षात ठेवी, कर्जवाटप आणि भाग भांडवलाची कोटीच्या कोटी उडाणे घेतली. संस्थेसाठी २४ हजार १५८ सदस्यांनी भागभांडवल उभे केले आहे. तर एक लाख ४४ हजार ६८१ नाममात्र सभासद संस्थेकडे आहेत.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेने १९ वर्षात ठेवी, कर्जवाटप आणि भाग भांडवलाची कोटीच्या कोटी उडाणे घेतली. संस्थेसाठी २४ हजार १५८ सदस्यांनी भागभांडवल उभे केले आहे. तर एक लाख ४४ हजार ६८१ नाममात्र सभासद संस्थेकडे आहेत.
९ राज्यात चालतो बीएचआरचा व्यवहार
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व छत्तीसगड या राज्यातील २४३ शाखांच्या माध्यमातून बीएचआर पतसंस्थेचे व्यवहार सुरु करण्यात आले. जळगाव, पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, यवतमाळ, बुलढाणा यासह राज्यभरात शाखा आहेत. बीएचआर पतसंस्थेला वाढता प्रतिसाद पाहता २०१२/१३ या वर्षात संस्थेने २९ नवीन शाखा सुरु केल्या. २०१३/१४ या वर्षभरात तब्बल ६६ नवीन शाखा कार्यान्वित करण्यात आल्या.
भागभांडवल आणि ठेवींमध्ये वाढ
बीएचआर पतसंस्थेबाबत सभासद, भागधारक आणि ठेवीदारांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाल्यामुळे प्रत्येक वर्षी भागभांडवल व ठेवींमध्ये वाढच होत गेली. २०१३/१४ या आर्थिक वर्षात बीएचआर पतसंस्थेकडे तब्बल ७३७ कोटी २७ लाख ८९ हजारांच्या ठेवी जमा झाल्या होत्या. वर्षभरात ठेवीच्या प्रमाणात तब्बल ५१.९६ टक्के वाढ झाली होती. या वर्षात सभासदांना ७६ लाख ७३ हजार रुपयांच्या लाभांशाचे वाटपदेखील करण्यात आले.
८८६ कोटींच्या कर्जवसुलीचे आव्हान
बीएचआर पतसंस्थेत जमा झालेल्या ठेवीच्या रकमेचा संस्थेकडून विनियोग करण्यात आला. २०१३/१४ या वर्षात कर्ज व ॲडव्हान्सेस यावर पतसंस्थेने ८८६ कोटी २४ लाख १४ हजार रुपये खर्च केला आहे. कर्ज व ॲडव्हॉन्स स्वरुपात दिलेल्या रकमेच्या वसुलीचे आव्हान नवनियुक्त अवसायक यांच्यावर आहे. यासह संस्थेनेे ९४५६.५० लाखांची जंगम व स्थावर मालमत्तेत गुंतवणूक केली आहे. संस्थेचे अन्य मार्गानी येणारी रक्कम ही २७६४.०५ लाख आहे. २०१४/१५ या आर्थिक वर्षात या आकड्यांमध्ये काही प्रमाणात ही भर पडलेली होती.