१७... तारसा धान परिषद

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:39+5:302014-12-18T00:40:39+5:30

(फोटो)

17 ... Tara Paddy Council | १७... तारसा धान परिषद

१७... तारसा धान परिषद

(फ
ोटो)
धानाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव द्या!
चाचेर येथे धान परिषद : धान उत्पादकांची मागणी
कोदामेंढी/तारसा : मौदा तालुक्यातील चाचेर येथे धान परिषद नुकतीच पार पडली. यात धानाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव देण्याची मागणी शेतकरी प्रतिनिधींनी केली.
प्रमुख अतिथी म्हणून योगराज गरपडे, प्रभाकर दारोडे, सुरेंद्र झाडे, सिद्धार्थ सिंगाडे, माजी उपसभापती अशोक हटवार, आकाश सहारे, योगेश घरपडे, विलास गवई, अशोक बावनकुळे, प्रकाश काळे, चंद्रभान निमगड्डा, राम गणमणी आदी उपस्थित होते. यावेळी धान उत्पादकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
धानाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव देण्यासह मिरचीवरील बोकड्या रोगाच्या नियंत्रणासाठी आर्थिक मदत करावी, शेतकऱ्यांवरील पीककर्ज माफ करावे, धानाची निर्यात खुली करावी, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे धान उत्पादकांना एकरी ५० हजार रुपये पीककर्ज देण्यात यावे, शेतकऱ्यांसाठी तत्काळ कर्जपुरवठा योजना सुरू करण्यात यावी, शेती गहाण कर्ज योजनेची मर्यादा एक लाखाऐवजी पाच लाख रुपये करावी यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. विधानसभेवर शेतकऱ्यांचा मोर्चा नेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
संचालन शैलेश कोपरकर यांनी केले. राहुल सहारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बाल्या टाले, वसंत वानखेडे, राम चिनटोरी, बाल्या पडोळे, नीलेश बोरकर, आकाश गोरले, सुनील डोंगरे, रामप्रसाद दारोडे, तुकाराम मेहर, मोमदेव देशमुख, ओमकार महादुले, अनुुराग बादोले, युवराज बालगोटे, संदीप बालगोटे, आकाश काळे, अनंत काळे यांच्यासह रामटेक, मौदा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
***

Web Title: 17 ... Tara Paddy Council