शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

१३... सारांश... जोड

By admin | Updated: February 14, 2015 01:07 IST

काटोल - खंडाळा मार्ग खड्ड्यात

काटोल - खंडाळा मार्ग खड्ड्यात
काटोल : तालुक्यातील काटोल - खंडाळा मार्गाची दुरुस्ती करण्यात न आल्याने त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
***
कामठी तालुक्यात मुरुम उत्खनन
कामठी : तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. या मुरुमाची ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याने चिकना परिसरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
खतांच्या टंचाईमुळे शेतकरी हवालदिल
मेंढला : परिसरात सध्या रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली आहे. गव्हाला सध्या युरियाची गरज असताना तो बाजारात मिळेनासा झाल्याने शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांमध्ये रासायनिक खते उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
***
मांढळ, पचखेडीचा वीजपुरवठा खंडित
मांढळ : पचखेडी येथील वीज उपकेंद्रावर मंगळवारी रात्री वीज कोसळल्याने संयंत्रामध्ये बिघाड निर्माण झाला आणि मांढळ व पचखेडी गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी वेळ लागल्याने या दोन्ही गावांमधील वीजपुरवठा ४८ तास खंडित होता.
***
भिवापुरातील नाल्यांची साफसफाई अर्धवट
भिवापूर : स्थानिक राजमार्गाच्या कडेला असलेल्या नाल्यांची साफसफाई करण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केले होते. मात्र, सदर काम अर्ध्यातच सोडून देण्यात आले. त्यामुळे या नाल्यांच्या साफसफाईचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***