शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

१३... गुन्हे

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक
तरुण जखमी : रहाडी शिवारातील अपघात
मौदा : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटरसायकलस्वार तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाडी शिवारात बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
शेखर राजू अंबोने (३०, रा. ब्राम्ह्यणी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. शेखर हा एमएच-४०/एसआर-४१२१ क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होता. दरम्यान, रहाडी शिवारात विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या सीजी-०७/एबी-८१६५ क्रमांकाच्या ट्रकने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. त्यात शेखरला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नोंदवून ट्रकचालक मुकेश सायबू गाडसे (२८, रा. हातीशपुरा, मध्य प्रदेश) यास अटक केली. सदर घटनेचा पुढील तपास मौदा पेालीस करीत आहे.
***
चोरट्यास अटक
पारशिवनी : तालुक्यातील कन्हान पोलिसांनी कन्हान खदान चोरी प्रकरणात चोरट्यास अटक केली. त्याने मशीनचे सुटे भाग चोरून नेले होते, अशी माहिती पेालिसांनी दिली.
श्रीराम श्यामलाल तांडेकर (५०, रा. वाघोली, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कन्हान येथील वेकोलिच्या खदान क्रमांक - ३ च्या आवारात काही मशीन ठेवल्या आहेत. दरम्यान, श्रीरामने त्या मशीनचे काही सुटे भाग चोरून नेले होते. त्या सुट्या भागांची किंमत १२ हजार रुपये असल्याचे पेालिसांनी सांगितले या प्रकरणी कन्हान पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. दरम्यान, आरोपी श्रीरामला गुरुवारी मध्यरात्री अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
***
कामठी शहरातून दुचाकी पळविली
कामठी : शहरातील खलासीलाईन भागातून चोरट्यांनी मोटरसायकल चोरून नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
फिर्यादी राधेश्याम मूलचंद खत्री (५२, रा. कामठी) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-३१/बीजी-८३७७ क्रमांकाची मोटरसायकल खलासीलाईन भागात उभी ठेवली होती. दरम्यान, चोरट्यांनी ती चोरून नेली. या मोटरसायकलची किंमत १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कामठी पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***