शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारी बोगस डॉक्टरला दहा वर्षांची शिक्षा

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

बलात्कारी बोगस डॉक्टरला दहा वर्षांची शिक्षामुंबई: डॉक्टर असल्याचे भासवत मुल होण्यासाठी उपचार करण्याच्या बहाण्याने एका विवाहीत महिलेवर बलात्कार करणार्‍या भांडूप येथील नदीम शेखला विशेष न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली़ही घटना २००५ मध्ये घडली़ तेथील एका महिलेला मुल होत नसल्याने तिला शेखकडे उपचार घेण्याचा सल्ला एका नातलगाने दिला़ त्यावेळी शेखने आपण ...




बलात्कारी बोगस डॉक्टरला दहा वर्षांची शिक्षा
मुंबई:
डॉक्टर असल्याचे भासवत मुल होण्यासाठी उपचार करण्याच्या बहाण्याने एका विवाहीत महिलेवर बलात्कार करणार्‍या भांडूप येथील नदीम शेखला विशेष न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली़
ही घटना २००५ मध्ये घडली़ तेथील एका महिलेला मुल होत नसल्याने तिला शेखकडे उपचार घेण्याचा सल्ला एका नातलगाने दिला़ त्यावेळी शेखने आपण डॉक्टर असल्याचा गाजावाजा भांडूपमध्ये केला होता़ प्रत्यक्षा तो एका रूग्णालयात सफाईचे काम करायचा़
पीडित महिला उपचारासाठी आल्यावर तो तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करायचा़ याचे त्याने मोबाईलमध्ये चित्रणही केले होते़ ही बाब महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तिला मोबाईलमधील चित्रण दाखवून ही बाब कोणालाही सांगू नकोस, धमकावले़ याचा फायदा घेत त्याने पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला़ अखेर तो या महिलेला त्याच्या मित्रांसोबत जाण्यासाठी भाग पाडत होता़ त्यामुळे त्या महिलेने हा प्रकार पतीला संागितला़ त्यानुसार पतीने याचा गुन्हा नांेदवला़ त्यावेळी शेख डॉक्टर नसल्याचेही स्पष्ट झाले़
याचा खटला विशेष न्यायालयात चालला़ पीडित महिला विवाहीत असल्याने शेखने याचा गैर फायदा घेतला़ त्यामुळे शेखला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील कल्पना हिरे यांनी न्यायालयाकडे केली़ त्याची नोंद करून घेत न्यायालयाने शेखला दहा वर्षांची शिक्षा व दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला़ दंडाची रक्कम महिलेला द्यावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे़