ंमंडल निरीक्षक लाच घेताना जेरबंद

By Admin | Updated: July 29, 2014 00:56 IST2014-07-29T00:10:27+5:302014-07-29T00:56:13+5:30

ंमंडल निरीक्षक लाच घेताना जेरबंद

The zombie supervisor was taking a bribe | ंमंडल निरीक्षक लाच घेताना जेरबंद

ंमंडल निरीक्षक लाच घेताना जेरबंद

नांदगाव : येथील तहसील कार्यालयाचे मंडल निरीक्षकास २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
मंडल निरीक्षक असलेले ए. के. अहेर यांनी बोलठाणच्या दीपक म्हस्के यांच्याकडे वाळूसंदर्भात २५ हजार रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात म्हस्के यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. सदरच्या तक्रारीनुसार पोलीस उपअधीक्षक अशोक कर्पे व सहकाऱ्यांनी तहसील कार्यालयात सापळा रचला होता.त्यानुसार, म्हस्के यांनी अहेर यांना २५ हजार रुपये दिले. त्यानंतर अहेर हे पैसे घेऊन तहसीलदारांना देण्याचे निमित्त करून केबिनमध्ये गेले. परंतु बऱ्याचवेळ होऊनही ते न आल्याने पथकातील अधिकारी केबिनमध्ये गेले. यावेळी अहेर यांच्याच खिशात २५ हजार रुपये मिळून आले असता अहेर याने सदरची रक्कम दंडाची असल्याचे सांगत बचाव करण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)

Web Title: The zombie supervisor was taking a bribe