येवल्यात पाच गावांची कोतवाली महिला करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2016 22:33 IST2016-05-15T22:21:30+5:302016-05-15T22:33:20+5:30

येवल्यात पाच गावांची कोतवाली महिला करणार

Youth will be women of five villages | येवल्यात पाच गावांची कोतवाली महिला करणार

येवल्यात पाच गावांची कोतवाली महिला करणार


येवला : येवले तालुक्यातील ३४ कोतवालांच्या जागांपैकी रिक्त असलेल्या ११ पदांसाठीची प्रक्रि या पूर्ण झाली असून, या उमेदवारांना शिफारशी देण्यात आल्या आहे. ११ पैकी ५ गावांची कोतवाली महिला करणार आहे. शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार शरद मंडलिक यांनी लेखीपरीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यावर शिफारशी करण्यात आल्या आहे. पोलिसांचा अहवालानंतर या उमेदवारांना अंतिम नियुक्त्या देण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी माळी यांनी दिली. कोतवाल पदासाठी शिफारशी दिलेले उमेदवार पुढीलप्रमाणे : भारम - पूजा अशोक शिंदे, एरंडगाव खुर्द - ज्ञानेश्वर बबन गोसावी, लहीत - नंदू लक्ष्मण बिन्नर, येवला शहर - प्रियंका सुरेश नढे, ठाणगाव - ज्योती विठोबा शिरसाठ, पिंपळगाव लेप - निर्मला शंकर दौंडे, बोकटे - दीपाली सचिन कदम, नगरसूल - विवेक नंदकिशोर गाडेकर, निमगाव मढ - नंदू बाळू दिवटे, धामोडे - सतीश दत्तात्रय भालेराव, नांदेसर - प्रवीण अशोक सोनवणे.

Web Title: Youth will be women of five villages