शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

चुकला काळजाचा ठोका!

By admin | Updated: July 31, 2016 00:33 IST

आदिरंग महोत्सव : निरनिराळ्या राज्यांतील कलावंतांच्या नृत्याविष्काराने नाशिककर थक्क

नाशिक : हातातल्या तळपत्या तलवारी एकमेकांवर त्वेषाने आदळणाऱ्या मणिपुरी युद्धपटूंचे नृत्य पाहून नाशिककरांच्या काळजाचा अक्षरश: ठोका चुकला. देशाच्या निरनिराळ्या प्रांतांतील एकाहून एक मनोहारी नृत्याविष्कार पाहून रसिक थक्क झाले अन् खच्चून भरलेल्या सभागृहातील प्रत्येकाने टाळ्यांची दाद दिली. नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (एनएसडी) व नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गायकवाड सभागृहात सुरू असलेल्या आदिरंग महोत्सवाचा दुसरा दिवस निरनिराळ्या राज्यांतील कलावंतांनी वैविध्यपूर्ण नृत्यांनी गाजवला. कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्राच्या बंजारा नृत्याने झाला. राजस्थानातून स्थलांतरित बंजारा बांधवांचे हे नृत्य आकर्षक वेशभूषेमुळे रसिकांना भावले. त्यानंतर दार्जिलिंग येथील गोरथा आदिवासींचे गोरथा लिंबू नृत्य रंगले. नवीन घरात प्रवेश करताना वाघाच्या कातड्याचे ढोल बडवून आनंद व्यक्त करतानाच्या या नृत्यातील कलावंतांच्या पायाच्या लयबद्ध हालचाली रसिकांच्या दाद घेऊन गेल्या. मध्य प्रदेशातील गोंड आदिवासी जमातीत बकासुराला प्रसन्न करण्यासाठी केला जाणारा सेला कर्मा हा नृत्याविष्कार सादर झाला. विविधरंगी फेटे परिधान करून हातात मोरपिस नाचवणाऱ्या या कलावंतांनी रसिकांना ठेका धरायला भाग पाडले. मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी आसाममधील बोडो जमातीच्या महिलांकडून होणारे ढाल-ठुमरी नृत्यही उपस्थितांना चांगलेच भावले. हातात ढाल व तलवार घेऊन महिला कलावंतांनी रणरागिणी अवतार सादर केला. बंगालमधील संथाल जमातीत विवाहाच्या वेळी केल्या जाणाऱ्या संथाली नृत्याने रसिकांना चांगलेच रिझवले. केरळमध्ये कार्तिकेयाच्या उपासनेसाठी कावडीला मोरपंख लावून केल्या जाणाऱ्या कावडी नृत्यालाही उपस्थितांनी दाद दिली.