शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या कलाकौशल्याचे अद्भुत दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:28 IST

निसर्गाने आपणाला भरभरून दिलं. काहीही कमी केलं नाही. मात्र, जन्मत: दिव्यांग असलेल्या व्यक्ती सुदृढ व्यक्तींप्रमाणे जेव्हा काम करतात किंवा आपल्या कला समाजासमोर मांडतात तेव्हा ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. शनिवारी (दि.१४) ‘कलर्स अनसिन’ या संस्थेतर्फे कालिदास कलामंदिर येथे शहरातील दिव्यांग बांधवांसाठी आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे१० संस्थांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार

नाशिक : निसर्गाने आपणाला भरभरून दिलं. काहीही कमी केलं नाही. मात्र, जन्मत: दिव्यांग असलेल्या व्यक्ती सुदृढ व्यक्तींप्रमाणे जेव्हा काम करतात किंवा आपल्या कला समाजासमोर मांडतात तेव्हा ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. शनिवारी (दि.१४) ‘कलर्स अनसिन’ या संस्थेतर्फे कालिदास कलामंदिर येथे शहरातील दिव्यांग बांधवांसाठी आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात शहरातील १० दिव्यांग संस्थांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित आपल्या कलाकौशल्याचे अद्भुत दर्शन घडविले.दिव्यांग म्हटले की, त्यांच्याविषयी मनात अनेक विचार येतात, मात्र याच व्यक्तींनी सुदृढ व्यक्तींपेक्षाही उत्तमरीतीने आपल्या कलेचे सादरीकरण केल्यास ती सर्वांसाठी थक्क करणारीच गोष्ट असते. त्यामुळे अशाच दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक अडचणींवर मात करून त्यांच्या अंगातील कला समाजाच्या समोर आणणे व सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘कलर्स अनसिन’ या संस्थेतर्फे शहरातील विविध दिव्यांग संस्थांतील विद्यार्थ्यांना एकत्र आणत त्यांच्या कलाविष्कारांना चालना दिली.यावेळी या उपक्रमात शहरातील १० दिव्यांग संस्थांतील विद्यार्थ्यांनी आपल्या अद्भुत कलांनी उपस्थितांना थक्क केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी गु्रप डान्स, नाटक, मल्लखांब, संगीतनाटक, जादूचे प्रयोग आदींचे सादरीकरण केले. महाराष्टÑात प्रथमच एकाचवेळी एवढ्या दिव्यांग मुलांना एकत्र आणत असा कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी कार्यक्रमास मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनीही या विद्यार्थ्यांना भरभरून दाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला. कलर्स अनसिन संस्थेच्या शुभदा बोरा, अनुपमा नारंग, सुनीता गणेरीवाल, विनिता बग्गा या महिलांनीएकत्र येत या कार्यक्रमाचेआयोजन केले होते. यासाठीत्यांना त्यांच्या कुटुंबियांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे हा कार्यक्रम रंगतदार झाला, असे या महिलांनी सांगितले.विविध संस्थांच्या विद्यार्थ्यांचे प्रयोगकार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘पडसाद’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘फुटपाथ’ या विषयावर नाटकाचे सादरीकरण केले. या नाटकाला राज्यस्तरावरही पुरस्कार मिळाला आहे. यानंतर ‘घरकुल’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी संगीत योगाचे सादरीकरण केले. तर ‘विकास मंदिर’च्या रोहित जैन याविद्यार्थ्याने जादूचे विविध प्रयोग सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. तर ‘अ‍ॅबिलिटी’, ‘सिद्धिविनायक’ व ‘माई लेले’ यासंस्थांच्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर ग्रुप डान्स केले. तर ‘व्ही एक्सेल’व ‘माईल्सस्टोन’ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी संगीत नाटकाचे सादरीकरणकेले. तर ‘घरकुल’ संस्थेच्या विद्यार्थिनींनी सोलो डान्स केला. यासगळ्या कार्यक्रमात ‘विकास मंदिर’च्या ५ ते १० वर्षाच्याविद्यार्थिनींनी दोरीवरच्या मल्लखांबाचे विविध प्रयोग सादरकरत उपस्थिताना थक्क केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक