शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रियांचा सहभाग आवश्यक

By admin | Updated: September 12, 2016 01:39 IST

क्रांती मोर्चा नियोजन : बैठकीत सर्वपक्षीय महिला नेत्यांची उपस्थिती

 नाशिक : कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शहरातून २४ सप्टेंबरला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचा सूर उमटला. गंगापूररोड परिसरातील सीएमसीएस महाविद्यालयाच्या सभागृहात मराठा समाजातील स्त्रियांची मोर्चाच्या नियोजनाविषीयी बैठक पार पडली. यावेळी समाजातील सर्वपक्षीय महिला नेत्यांनी स्त्री सुरक्षेसाठी स्त्रियांनी घराबाहेर पडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, गौरी आडके , माधुरी भदाने, सुलोचना हिरे, माधवी पाटील, रश्मी हिरे आदि विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाच्या विविध समस्यांविषयी माहिती दिली. एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाजातील अनेक कु टुंबांना आता दोन वेळच्या उदरनिर्वाहासाठीही संघर्ष करावा लागत आहे. कोपर्डीसारख्या घटनांमुळे मुलीही सुरक्षित नसल्याचे समोर आले असताना अशा अत्याचाराच्या घटनांसह इतर प्रकरणामध्येही अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होतो. त्यामुळे समाजात मुलींवर घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात व समाजाला अ‍ॅट्रॉसिटीच्या भीतीच्या सावटातून मुक्त करण्यासाठी महिलांनी उभे राहण्याची वेळ आली असून, महिला सक्षमीकरणासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्यासाठी समाजातील महिलांनी एकत्रित येणे आवश्यक असल्याचे मत बैठकीसाठी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले. हा मूक मोर्चा असल्याने गप्पा मारणे, सेल्फी काढणे, घोषणाबाजी टाळण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. दरम्यान, समाजातील महिलांच्या बैठकीला सुरुवातच असल्याने प्रतिसाद कमी प्रमाणात असला तरी पुढील बैठकांसाठी अधिकाधिक समाज भगिणींपर्यंत पोहोचण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. (प्रतिनिधी)