नाशिक : विषारी औषध प्राशन करून महिलेने आत्महत्त्या केल्याची घटना पेठरोडवरील मेहेरधाम परिसरातील यशोदानगरमध्ये गुरुवारी (दि़ ८) घडली़ मयत महिलेचे नाव रंजना मधुकर सुरसे (३८) असे आहे़ सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सुरसे यांनी विषारी औषध प्राशन केल्याची बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तत्काळ पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़; मात्र उपचार सुरू असतानाच दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}