शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने वाईन ग्रेप्सलाही फटका, 10 ते 15 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 19:22 IST

गारपीट व बेमोसमी पाऊस आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपदांमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यावर पर्याय म्हणून टेबल ग्रेपसह वाइन ग्रेप उत्पादित करीत अनेक शेतकरी जोखीम कमी करण्यासोबत शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा पर्याय निवडत असले तरी यावर्षी लांबलेला पावसाळा आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नाशिकमध्ये टेबल ग्रेप्ससोबतच वाइन ग्रेप्सलाही काही प्रमाणात फटका बसला आहे.

ठळक मुद्देवाईन पंढरी नाशिकला परतीच्या पावसाचा फटका वाईन ग्रेप्सच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

नाशिक : गेल्या काही वर्षांत गारपीट व बेमोसमी पाऊस आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपदांमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यावर पर्याय म्हणून टेबल ग्रेपसह वाइन ग्रेप उत्पादित करीत अनेक शेतकरी जोखीम कमी करण्यासोबत शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा पर्याय निवडत असले तरी यावर्षी लांबलेला पावसाळा आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नाशिकमध्ये टेबल ग्रेप्ससोबतच वाइन ग्रेप्सलाही काही प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे यावर्षी वाइन उत्पादनात १० ते १५ टक्के घट होण्याची शक्यता वाइन उद्योजकांकडून व्यक्त होत आहे. द्राक्षाची पंढरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये वायनरी उद्योग बहरल्याने या शहराने जगभरात ‘वाइन कॅपिटल’ अशी ख्याती मिळविली आहे. या वाइन उद्योगाच्या वाढत्या विस्तारामुळे वाइन ग्रेप पिकविणाऱ्या उत्पादकांनाही चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली असून, गारपीट व बेमोसमी पाऊस अथवा दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये वाइन उद्योग नाशिकमधील द्राक्षशेतीला नवसंजीवनी देणारा ठरतो आहे. परंतु, यावर्षी वाइन ग्रेप्सलाही परतीच्या पावसाचा काही प्रमाणात फटका बसला आहे. बागांमधील छाटणीचा कालावधी मागे-पुढे होण्यासोबतच द्राक्षांचे घड फुलोऱ्यात जिरण्याच्या प्रकारामुळे वाइन ग्रेप्सच्या उत्पादनात घट होऊन त्याचा परिणाम उत्पादनावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतात साधारणत: सन २००० पासून वाइन उद्योग बहरला असून, देशात द्राक्ष उत्पादनासाठी अतिशय पोषक वातावरण असल्याने विशेषत: महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांनी जागतिक दर्जाच्या द्राक्ष उत्पादनाला सुरुवात केली. देशातील द्र्राक्ष उत्पादनाच्या जवळपास ५० टक्के वाटा महाराष्ट्रातून येतो. यातील ७० टक्के उत्पादन केवळ नाशिकमध्ये घेतले जाते. नाशिक परिसरात सुमारे तीन ते साडेतीन हजार एकरवर वाइन ग्रेप्सचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे जानेवारी ते एप्रिल या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत हार्वेस्टींग होणाऱ्या १५ ते १७ हजार टन द्राक्षांपासून सुमारे सव्वा ते दीड कोटी लिटर वाइनचे उत्पादन घेतले जाण्याचा अंदाज ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिवाजी अहेर यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकRainपाऊस