राष्ट्रवादीत छबूचा गॉडफादर कोण?

By Admin | Updated: January 7, 2017 01:31 IST2017-01-07T01:31:20+5:302017-01-07T01:31:31+5:30

चलबिचल : दशकभरापासून पक्षात कार्यरत

Who is the Chhabu Godfather in the Nationalist Congress Party? | राष्ट्रवादीत छबूचा गॉडफादर कोण?

राष्ट्रवादीत छबूचा गॉडफादर कोण?

 नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी थेट ‘रत्न’ असा उल्लेख करीत, अशा लोकांना पक्षात आणले कोणी? याचा तपास तटकरेंनी घेतला पाहिजे, असे विधान केल्याने आता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गोटात चलबिचल सुरू झाली आहे.
छबू नागरे हा नाशिक शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा विद्यमान कार्याध्यक्ष होता. कार्याध्यक्ष हे पदच गेल्या काही महिन्यांपूर्वी निर्मिले गेले. नागरे सोबतच जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विष्णुपंत म्हैसधुणे यांची, तर युवक कॉँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी वैभव देवरे यांची निवड करण्यात आली.तत्पूर्वी छबू नागरे याने राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस, जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉँग्रेस मध्ये काम केले आहे.त्याला राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आणण्यात पक्षाच्याच एका नेत्याचा जसा हात असल्याची चर्चा आहे, तसाच त्याला विविध पदे मिळवून देण्यात दुसऱ्या एका पदाधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा आहे. अर्थात झाल्या प्रकारानंतर हे सर्व ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असून छबू नागरेबाबत पक्षाच्या वरिष्ठांना माहिती देण्यास कोणीही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता पुढे येणार नाही, असे चित्र आहे. त्यामुळे स्वत: शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना छबू नागरे यांना पक्षात कोणी आणले? त्याचे पक्षातील गॉडफादर कोण? हे शोधण्याचे आदेश दिलेले असले तरी प्रत्यक्षात यातून काही बाहेर येईल, याची शक्यता कमीच आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Who is the Chhabu Godfather in the Nationalist Congress Party?