शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

अमृताचा लाभ घेताना ‘चपलांचा अहेर’त्

By admin | Updated: September 26, 2015 22:47 IST

अमृताचा लाभ घेताना ‘चपलांचा अहेर’त्

र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्यातील तिसरी पर्वणी अपूर्व उत्साहात पार पडल्यानंतर मुहूर्तावर कुशावर्तात स्नान करण्यासाठी जवळपास लाखाच्या वर भाविकांनी त्र्यंबकनगरी गजबजली होती. कुशावर्ताच्या दिशेने चारही बाजूंनी भाविकांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. कुशावर्तात येण्याचा आणि स्नान केल्यावर बाहेर पडण्याचा मार्ग भिन्न असल्यामुळे आणि कुशावर्त कुंडात चपला वापरण्यास मनाई असल्याने भाविकांच्या चपलांचा खच जागोजागी दिसत होता. सफाई कर्मचाऱ्यांनी या चपला ट्रॅक्टरमध्ये जमा करून कचरा डेपोकडे त्या पाठविल्या.शुक्रवारी ४८ तासांत पाच ट्रॅक्टर चप्पल केवळ कुशावर्त परिसरात जमा झाल्याचे समजते. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातही तीच गत होती. मंदिरात प्रवेश करण्याचा मार्ग व बाहेर पडून बसस्थानकाकडे जाण्याचा मार्ग भिन्न असल्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात चपलांचा खच निर्माण झाला. चपलांबरोबरच कुशावर्त परिसरात भाविकांनी स्नान झाल्यानंतर ओले कपडेही तेथेच सोडून देण्यावर भर दिल्याने कपड्यांचाही ढीग पहायला मिळतो आहे. सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असले तरी गर्दीने भरलेले त्र्यंबकेश्वर पाहता हा कचरा वाहून कसा न्यायचा, कुठपर्यंत न्यायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. गर्दीमुळे आणि जागोजागी उभ्या असलेल्या बॅरिकेडिंगमुळे घंटागाड्यांची गावातून ने-आण करणेही अवघड झाले आहे. गर्दीचा ओघ कमी झाल्यानंतरच गावातील स्वच्छता व्यवस्थितपणे करणे शक्य होणार आहे. तासनतास रांगेत प्रतीक्षा करणाऱ्या स्नानाच्या आणि मंदिर दर्शनाच्या भाविकांना त्र्यंबकनगरीत जागोजागी अल्पोपहार, चहा, कॉफी, दूध यांचेही वाटप करण्यात आले. त्यामुळे कागदी डीश, मिनरल वॉटरच्या बाटल्या, कागदी कप, प्लॅस्टिकचे कप यांचाही कचरा जागोजागी दिसून येत आहे. लाखो भाविकांनी कुशावर्तात स्नान केल्यानंतर आता त्यातील पाण्यालाही दुर्गंधी येत असून, भाविकांची संख्या मर्यादित झाल्यानंतर तीर्थातील सर्व पाणी उपसून टाकणे आणि गावात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविणे अत्यंत गरजेचे बनले आहे.