शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
3
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
4
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
5
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
6
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
7
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
8
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
9
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
10
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
11
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
12
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
13
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
14
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
15
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
16
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
17
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
18
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
19
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
20
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...

...जेव्हा उड्डाणपूलावर पाच ट्रक एकमेकांवर आदळतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 15:54 IST

घटनेची माहिती मिळताच सहा वाजेच्या सुमारास सिडको अग्नीशमन दलाच्या उपकेंद्रावरील जवान बंबासह दाखल झाले; मात्र अपघाताची तीव्रता आणि वाहनांचा चेंदामेंदा बघून त्यांनी तत्काळ शिंगाडा तलाव येथील मुख्यालयाशी संपर्क साधत 'हॅजमेट' वाहनाची मदत मागितली.

ठळक मुद्देसुदैवाने जीवीतहानी टळलीगोविंदनगरजवळ पहाटे दुर्घटनाअग्नीशमन दलाचे जवान ठरले देवदूत

नाशिक : मुंबईकडून द्वारकेच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर गोविंदनगर परिसरात एकापाठोपाठ पाच अवजड ट्रक एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे जखमी झाले. मंगळवारी (दि.२४) पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी टळली.याबाबत अधिक माहिती अशी, पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबईकडून नाशिकमध्ये जाणारा ट्रक (सीजी०४ जेडी८२५१) गोविंदनगरजवळ उड्डाणपूलावर नादुरूस्त झाला. यामुळे चालकाने उड्डाणपुलावर रस्त्यालगत ट्रक उभा करत दुरूस्तीसाठी चाचपणी सुरु केली. यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने त्याचा ट्रक (एमपी०९ एचएच५०१६) हा नादुरूस्त ट्रकवर जाऊन आदळला. दरम्यान, त्याच्या पाठीमागे असलेल्या ट्रकचालकाची भंबेरी उडाल्याने त्याच्या ताब्यातील कंटेनर (एम.एच ४३ बीपी ६३५५) समोरील ट्रकवर जाऊन आदळला. त्याच्या पाठीमागून येत असलेला ट्रकदेखील या कंटेनरवर आदळला. त्यापाठोपाठ पाचवा ट्रक (एम.एच१८बीजी ७४९१) हादेखील पाठीमागून येत ट्रकवर वेगाने आदळला. या ट्रकमध्ये लोखंडी पत्र्याचा माल भरलेला होता. अपघातात दणका बसल्याने सर्व पत्रे हलले आणि चालकाच्या कॅबीनमध्ये पाठीमागून घुसले; मात्र लाकडी सीट भक्कम असल्याने चालक-क्लिनर बचावले. घटनेची माहिती मिळताच सहा वाजेच्या सुमारास सिडको अग्नीशमन दलाच्या उपकेंद्रावरील जवान बंबासह दाखल झाले; मात्र अपघाताची तीव्रता आणि वाहनांचा चेंदामेंदा बघून त्यांनी तत्काळ शिंगाडा तलाव येथील मुख्यालयाशी संपर्क साधत 'हॅजमेट' वाहनाची मदत मागितली.

काही मिनिटांतच लिडिंग फायरमन इकबाल शेख, फायरमन किशोर पाटील, तौसीफ शेख, विजय शिंदे, अनिल गांगुर्डे, बंबचालक शरद देटके हे घटनास्थली आवश्यक ती सर्व साधनसामुग्रीसह दाखल झाले. या जवानांनी वेळीच धाव घेत ट्रकच्या कॅबीनमध्ये अडकलेल्या चालक-वाहकाला दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर सुरक्षितरित्या 'रेस्क्यू' केले. या दुर्घटनेत ट्रकचालक करण जमरे, क्लीनर कृष्णा कन्नोजे हे जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अग्नीशमन दलाचे जवान ठरले देवदूतघटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी वेळेत धाव घेतली. इलेक्ट्रीक हायड्रोलिक कटर, ट्रेडर, जॅक आदी साहित्याचा कुशलतेने वापर करत आपल्या अनुभवाच्या जोरावर जवानांनी ट्रकच्या चालकबाजूचा पत्रा कापून काढला. 

टॅग्स :Nashikनाशिकhighwayमहामार्गAccidentअपघातNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दल