What are you saying ... only 5 rupees onion | काय सांगताय...कांदा फक्त ३० रुपये किलो
काय सांगताय...कांदा फक्त ३० रुपये किलो

ठळक मुद्देसेंद्रिय बाजार : तासाभरातच १०० किलो विक्री

नाशिक : काय सांगताय...कांदा फक्त ३० रुपये प्रतिकिलो! कुठे? आम्हालाही मिळेल का? अशाच प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे. सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने शेतमालाचे भाव गगणाला भिडले आहे. सध्या किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने मिळत असून गंगापूररोडवरील सेंद्रिय बाजारात कांदा फक्त ३० रुपये किलो प्रतिकिलो दराने मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी कांदा घेण्यासाठी याठिकाणी परिसरातील नागरिक गर्दी करत आहे.
रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे कुर्तकोटी सभागृहाच्या पार्किंगमध्ये
काही दिवसांपासून प्रत्येक महिन्याच्या दुसºया व चौथ्या रविवारी ‘सेंद्रिय भाजीपाला’ उपलब्ध होत असतो. याठिकाणी जिल्ह्यातील विविध भागांतून शेतकरी आपला सेंद्रिय शेतीमाल याठिकाणी विक्रीसाठी आणत असतात. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल ५ ते ६ हजार रुपये भाव मिळत असल्याने शहरातील किरकोळ बाजारात कांद्याला ७० ते ८० रुपये भाव मिळत असताना सेंद्रिय बाजारात कांदा फक्त ३० रुपये किलो दराने मिळत असल्याने कांदा खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे रविवारी (दि.१०) फक्त १ तासातच १०० किलो कांदा विक्री झाला. येवल्यातील सदाशिव शेळके या शेतकऱ्यांने या बाजारात कांद्यासह, टमाटे, बटाटे, काकडी, वांगे, भोपळा, शिमला मिरचीसह इतर भाज्याही विक्रीसाठी आणल्या होत्या. कांद्याप्रमाणे इतर भाज्यांचे दरही ३० रुपये प्रतिकिलोप्रमाणेच असल्याने सर्वच भाजीपाला ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. या बाजारात कांद्यासोबत इतर भाजीपाला, फळभाज्यादेखील उपलब्ध असून, इतर बाजारभावापेक्षा त्यांचाही भाव अंत्यत कमी दिसून येत आहे. त्यात हा भाजीपाल्याच्या उत्पादनासाठी फक्त सेंद्रिय खताचा वापर झाल्याने ग्राहकांची याला चांगली पसंती मिळत आहे.
सेलिब्रिटींनाही भुरळ
शेळके हे गेल्या १५ वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे उत्पन्न घेत असून, गेल्या ११ वर्षांपासून ते दर रविवारी मुंबईतील बांद्रा येथे त्यांचा सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी नेत आहे. विशेष म्हणजे याठिकाणी त्यांच्याकडून आमिर खान यांच्या पत्नी किरण राव, काजोलसह इतरही काही मोठ्या सेलिब्रिटी रांगेत उभे राहून न चुकता भाजीपाला खरेदी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: What are you saying ... only 5 rupees onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.