शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

उत्तर महाराष्टत ओल्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 1:45 AM

यंदाच्या वर्षी वरूणराजाने आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिल्याने आतापर्यंत नाशिक विभागात एकूण १६८ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९१ टक्के पाऊस जादा झाला आहे.

नाशिकरोड : यंदाच्या वर्षी वरूणराजाने आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिल्याने आतापर्यंत नाशिक विभागात एकूण १६८ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९१ टक्के पाऊस जादा झाला आहे.१ जून ते ३० सप्टेंबर या पावसाळा ऋतुच्या चार महिन्यांच्या कालावधीत नाशिक विभागात सरासरी १५० टक्के पाऊस झाला होता. आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने महिन्याभरात सरासरी १८ टक्के पाऊस पडला आहे. १ जून ते ३१ आॅक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत नाशिक विभागामध्ये १६८ टक्के पाऊस पडला आहे.गेल्यावर्षी पाच महिन्यांच्या कालावधीत सरासरी ७६ टक्के पाऊस पडण्याची नोंद करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी गेल्या वर्षापेक्षा ९१ टक्के जास्त पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या ३० वर्षात सर्वाधिक पाऊस पडल्याचे सांगण्यात येत आहे. दुप्पटीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने शेतमालाचे नुकसान झाले असून ओल्या दुष्काळाचे संकट ओढावले आहे.नाशिक जिल्ह्यामध्ये जून ते आॅक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत १६९२ मिमी (१६७ टक्के) पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी ८८ टक्के पाऊस पडला होता. गेल्यावर्षी पेक्षा यंदा ७९ टक्के पाऊस जास्त झाला आहे.धुळे जिल्ह्यात १०७३ मिमी (२०२ टक्के) पाऊस पडला असून गेल्यावर्षी ७६ टक्के पाऊस पडला होता. यंदा १२६ टक्के जास्त पाऊस पडला आहे. नंदुरबार जिल्ह्यात १३७० मिमी (१६४ टक्के) पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली असून गेल्यावर्षी ६७ टक्के पाऊस पडला होता. यंदा ९७ टक्के जास्त पाऊस पडला आहे.जळगाव जिल्ह्यात ९२४ मिमी (१३९ टक्के) पाऊस पडला असून गेल्यावर्षी ६७ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. यंदा गेल्यावर्षी पेक्षा ७२ टक्के जास्त पाऊस पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात ७७९ मिमी (१७८ टक्के) पाऊस झाला असून, गेल्यावर्षी ७९ टक्के तर यंदाच्या वर्षी ९९ टक्के जास्त पाऊस पडला आहे.नाशिक विभागामध्ये जून ते आॅक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीत एकूण सरासरी ११६८ मिमी (१६८ टक्के) पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी विभागात ७६ टक्के पाऊस पडला होता. गेल्या वर्षीपेक्षा ९१ टक्के जास्त पाऊस झाल्याने सदर पाऊस दुपटीपेक्षा अधिक नोंदला असून, त्यामुळे ओल्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे.थंडी वाढण्याची शक्यतायंदा पावसाळा ऋतू संपल्यानंतर आॅक्टोबर हीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिन्यात परतीच्या पावसाने चांगलाच कहर केला आहे. यामुळे आॅक्टोबर हीटची गर्मी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत जाणविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर थंडी जाणवण्यास सुरुवात होईल. यंदा दुपटीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने थंडीचा कडाकादेखील जास्त राहाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.धुळे, नंदुरबार जिल्हाधुळे तालुका- ८६१ मिमी (१५५ टक्के), शिंदखेडा- १०२७ मिमी (२०२), शिरपूर- १५१८ मिमी (२३५), साक्री- ८८८ मिमी (२१६).नंदुरबार तालुका- ११९० मिमी (१८५ टक्के), शहादा- ११९७ मिमी (१७४ टक्के), अक्राणी- १६०० मिमी (२१० टक्के), अक्कलकुवा- १५२२ मिमी (१४८ टक्के). तळोदा- ११९४ मिमी (१५४ टक्के), नवापूर- १५१७ मिमी (१३५ टक्के) पाऊस झाला आहे.नाशिक जिल्हाजून ते आॅक्टोबर या पाच महिन्यात नाशिक तालुका १३७५ मिमी (२२४ टक्के), इगतपुरी - ५४८५ मिमी (१६५), दिंडोरी- १३१६ मिमी (१८९), पेठ- ३४०२ मिमी (१५५), मालेगाव- ७०१ मिमी (१५९), नांदगाव- ७१७ मिमी (१५४), चांदवड- ८०५ मिमी (१५५), कळवण- ८०२ मिमी (१२१), बागलाण- ७८३ मिमी (१८७), निफाड- ७६१ मिमी (१७८), सुरगाणा- २९०४ मिमी (१६६), सिन्नर- ८८५ मिमी (१८०), येवला- ८६२ मिमी (१९९), त्र्यंबकेश्वर- २९१२ मिमी (१७८), देवळा- ६७५ मिमी (११८).अहमदनगर जिल्हाअहमदनगर तालुका- ७६७ मिमी (१६७ टक्के), अकोला- १५२३ मिमी (३४९), संगमनेर- ७७० मिमी (२१४), कोपरगांव- ६१२ मिमी (१६०), श्रीरामपूर- ८९७ मिमी (२१६), राहुरी- ६५७ मिमी (१५७), नेवासा- ९५९ मिमी (२०४), राहता- ६७७ मिमी (१७८), शेवगांव- ७४७ मिमी (१४७), पाथर्डी- ७९१ मिमी (१६१), श्रीगोंदा- ६१६ मिमी (१६६), कर्जत- ५२९ मिमी (१२१), जामखेड- ६७७ मिमी (११९), पारनेर- ६८१ मिमी (१६६).जळगाव जिल्हाजळगाव तालुका- ८०७ मिमी (११७ टक्के) जामनेर- ११३१ मिमी (१५७), एरंडोल- ८७२ मिमी (१४०), धरणगांव- ७४० मिमी (११९), भुसावळ- ९३५ मिमी (१४०), बोदवड- ९९१ मिमी (१४८), यावल- ९९८ मिमी (१४३), रावेर- १०१० मिमी (१५१), मुक्ताईनगर- ८९७ मिमी (१४३), अमळनेर- ८०३ मिमी (१३८), चोपडा- ८६३ मिमी (१२५), पारोळा- ९१० मिमी (१४८), पाचोरा- १०१८ मिमी (१३७), चाळीसगांव- ९२३ मिमी (१४०), भडगांव- ९६७ मिमी (१४४) पाऊस पडला आहे.

टॅग्स :Rainपाऊसdroughtदुष्काळ