शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

संकेतस्थळ जाम

By admin | Updated: June 9, 2015 02:17 IST

संकेतस्थळ जाम

नाशिक : दहावीचा निकाल अधिकृतपणे दुपारी एक वाजता संकेतस्थळावर जाहीर होणार असला तरी निकालाच्या एक तास आधीच अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर नाशिक विभागाच्या निकालाची टक्केवारी फिरत असल्यामुळे सायबर कॅफेवर एकच गर्दी झाली. त्यामुळे दुपारी एक वाजता संकेतस्थळ जाम झाले होते. दुपारी साडेबारापासूनच विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी संकेतस्थळ सुरू केल्यामुळे दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र सुमारे अर्धा तास कुणालाही निकाल पाहणे शक्य झाले नव्हते. एकीकडे असे चित्र असताना बाहेरगावाहून अनेकांनी नाशिकमधील नातेवाइकांना भ्रमणध्वनी करून निकाल लागण्याची वार्ता पोहचविली. अनेकांनी तर भ्रमणध्वनीवरील संकेतस्थळावरच निकाल पाहिल्याचे सांगितले. मात्र संकेतस्थळावरून निकालाची प्रिंट निघेपर्यंत बराच वेळ लागत होता. थ्रीजी सुविधा असलेल्या भ्रमणध्वनीवर मात्र त्या तुलनेत लवकर निकाल बघता येत होता, असा दावा अनेक विद्यार्थ्यांनी केला. एकाचवेळी अनेक जण संकेतस्थळावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत असल्याने संकेतस्थळ ठप्प झाल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, यंदा अनेक शाळांमध्ये निकालानंतर विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याचे दिसून आले. शाळांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)