शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थितीनुरूप निर्णय घेणार असलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी सर्व प्रकारची सज्जता करण्यात येत असून, तयारीला वेग देण्यात आला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी सर्व प्रकारची सज्जता करण्यात येत असून, तयारीला वेग देण्यात आला आहे. कोरोनाबाबत परिस्थिती बघूनच सर्व निर्णय घेण्यात येणार असून, सर्व प्रकारची दक्षता, स्वच्छता, फवारणी, सॅनिटायझेशनला प्राधान्य देऊनच संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री आणि स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ फार्म येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी ही माहिती दिली. साहित्य संमेलन स्थळाला कुसुमाग्रज नगरी नाव देण्यापासून ते विज्ञान साहित्याचा समावेश असलेल्या स्मरणिकेच्या कामापर्यंत सर्व बाबींचा अंतर्भाव त्यात करण्यात आला आहे. संमेलनाच्या आयोजनात जिल्ह्यातील लेखकांच्या साहित्याचे, तसेच विविध कलाकारांच्या कलांचे प्रदर्शन, प्रात्यक्षिक दर्शन केले जाणार आहे. त्याशिवाय यंदाच्या संमेलनापासून प्रथमच बालकुमार साहित्य मेळाव्याचेदेखील दर्जेदार आयोजन केले जाणार आहे. कोरोनाबाबत सर्व परिस्थिती बघून योग्य ते निर्णय घेतले जाणार आहेत. मात्र, संमेलनात गर्दी कमी व्हावी, म्हणून कोणत्याही उपाययोजना करण्यात येणार नाहीत. संमेलनाला येऊ नका, असे कुणालाही सांगता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे स्वच्छतेच्या, सुरक्षिततेच्या अधिक उपाययोजना कराव्या लागणार असल्याने संमेलन आयोजनाच्या खर्चातही वाढ होणार आहे. त्यामुळेच आम्ही सर्व आमदारांना निधीबाबत विनंती केली आहे. तो निधी देण्याबाबत कुणात एकमत नसले तरी त्याबाबत जबरदस्ती केलेली नसल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, दादा गोरे, समीर भुजबळ, विश्वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

विद्रोही संमेलनालादेखील सर्व नियम लागू

विद्रोही साहित्य संमेलनालाचेही मार्चमध्येच आयोजन केले जाणार असले तरी कोरोनाबाबतचे शासनाचे नियम हे सर्व संमेलनांना आणि सर्वच ठिकाणी लागू राहणार आहेत. संमेलन कोणतेही असले तरी ते अधिकाधिक काळजी घेऊन पार पाडावे लागणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

इन्फो

मोठ्या मैदानावर मुख्य सोहळा

संमेलनासाठीचे आधीचे मुख्य मैदान लहान पडण्याची शक्यता लक्षात घेऊन गोएसो कॅम्पसमधील क्रिकेटच्या मोठ्या मैदानावरच मुख्य कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे लोकहितवादी मंडळाचे उपाध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी सांगितले. मैदानात १५ हजार खुर्च्यांची क्षमता असली तरी तिथे ७ हजार खुर्च्या ठेवून सुरक्षित अंतराबाबत दक्षता घेतली जाणार असल्याचेही टकले यांनी नमूद केले.

फोटो

२१भुजबळ संमेलन फोटो

साहित्य संमेलनाबाबतच्या पत्रकार परिषदप्रसंगी बोलताना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ. समवेत समीर भुजबळ, कौतिकराव ठाले पाटील, हेमंत टकले, जयप्रकाश जातेगावकर, दादा गोरे, विश्वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील आदी.