शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

भातोड्याचा लौकीक इतिहासजमा होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 16:24 IST

भातक्षेत्रात घट : काही शेतकरी कुटुंबाकडून वारसा जतन

ठळक मुद्देपरिसरातील सुमारे ५०० एकर शेतीक्षेत्रात कमोद गरीकोळपी, काळकुडी पेर अशा जातीच्या भाताचे उत्पादन घेण्यात येत असे

प्रवीण दोशीवणी : एकेकाळी शंभर टक्के भात उत्पादनामुळे ‘भातोडा’ हे नाव धारण करणाऱ्या भातोडा गावाचा लौकीक आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. कमी लागवड क्षेत्र आणि नगदी पिके घेण्याचा कल यामुळे भातोड्यातील भात उत्पादनात घट झाली आहे. क्षेत्रात घट झाली असली तरी काही शेतकरी कुटुंबाकडून मात्र भात उत्पादनाचा पारंपारिक वारसा जपला जाताना दिसून येत आहे.सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल भातोडा गावाची लोकसंख्या अवघी २१०० आहे. भाताची शेती हा येथील परंपरागत व्यवसाय. परिसरातील सुमारे ५०० एकर शेतीक्षेत्रात कमोद गरीकोळपी, काळकुडी पेर अशा जातीच्या भाताचे उत्पादन घेण्यात येत असे. त्यावेळी नदीवर तात्पुरत्या स्वरूपाचे बंधारे बांधून, विहिरीतील पाणी मोटेद्वारे काढुन तर ब-याच अंशी पावसाच्या पाण्यावर भातशेती अवलंबून असे. संपूर्णत: नैसर्गिक पदध्तीने शेणखत टाकुन भात उत्पादित केला जायचा. लावणी, निंदणी, कापणी, मळणी, पात धरणे, पेंढ्या बांधून झटकणे, रचणे व वाळविणे अशा प्रक्रियेत १२० दिवसांचा कालावधी जायचा. त्यावेळी कुटुंबातील महिलावर्ग पुरुषांच्या बरोबरीने करून भात उत्पादन वाढविण्यासाठी अग्रभागी राहायचा. भातवाळवणीनंतर बैलगाडयांमधून वाहतुक करून गरजेनुसार हॉलर मिलमधून भात काढुन तांदुळ विक्र ीतून उदरिनर्वाह व्हायचा. विशेष म्हणजे भातोड्याचा तांदुळ पंचक्र ोशीत प्रसिद्ध असल्याने बाहेरगावचे ग्राहक खास भातोडा येथे खरेदीसाठी यायचे. मात्र, कालौघात १९९५ च्या नंतर शेतकरी द्राक्ष, टमाटा, भाजीपाला या नगदी पिकांसह दुग्ध व्यवसायाकडे वळाले. हळूहळू क्षेत्र कमी होऊन भाताच्या उत्पादनात घट होत गेली. मात्र, भातोडे गावाचा भात उत्पादनाचा हा वारसा आजही काही कुटुंब जोपासताना दिसून येतात. सध्यस्थितीत १०० एकर क्षेत्रात इंद्रायणी दप्तरी, कोळपी, बासमती, आर 24, पार्वती, रत्नागिरी, पेरभात अशा जातीच्या भाताचे उत्पादन घेण्यात असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.या वर्षी मोठ्या प्रमाणावर पिक भातोडागावात भातक्षेत्र घटले असले तरी दर्जेदार भात उत्पादनाचा नावलौकीक कायम आहे. दरम्यान या वर्षी भात पिकाची पश्चिम पट्यात उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. अतिवृष्टीचा फटका इतर पिकांच्या तुलनेत भाताला कमी बसला तसेच भरपूर पाणी मिळाल्याने भाताचे पिक या वर्षी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे.- नीलेश गायकवाड, शेतकरी, करंजाळी

टॅग्स :Nashikनाशिक