शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ममदापूर परिसरात पाणीटंचाई : टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:16 IST

ममदापूर : येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ममदापूर ग्रामपंचायतीने जानेवारी महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी करूनदेखील अद्यापपर्यंत टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, केव्हाही पिण्याच्या पाण्यासाठी उद्रेक होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी ममदापूर परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे गावाशेजारी असलेला बंधारा जानेवारी महिन्यात ...

ममदापूर : येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ममदापूर ग्रामपंचायतीने जानेवारी महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी करूनदेखील अद्यापपर्यंत टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, केव्हाही पिण्याच्या पाण्यासाठी उद्रेक होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी ममदापूर परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे गावाशेजारी असलेला बंधारा जानेवारी महिन्यात कोरडा पडल्याने बंधाऱ्याशेजारी असलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या दोन्ही विहिरीत पाणी नसल्याने गावातील ग्रामस्थांना एकाच हातपंपावर तहान भागवावी लागत आहे. पिण्यासह वापरण्याच्या पाण्यासाठी हातपंपावर गर्दी वाढल्याकारणाने रात्रीच नंबर धरून पाणी भरावे लागत आहे, तर काही कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वाडी-वस्तीकडे पाणी कमी असल्याने बºर्याच ठिकाणाहून रिकाम्या हाताने परत फिरावे लागत असल्याने सर्व स्तरातून प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईचा निषेध केला जात आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीरटॅँकर मागणी करून दीड महिना उलटला तरी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी पाहणीदेखील केलेली नसून प्रस्ताव केराच्या टोपलीत टाकला की काय, असा प्रश्न ममदापूर येथील ग्रामस्थांना पडला आहे. सरपंच, ग्रामसेवक यांना पाण्याचा टॅँकर कधी सुरू होणार अशी विचारणा केली असता उद्या सकाळी टॅँकर येणार एवढेच सांगण्यात येते. मग हा उद्या उगवणार तरी केव्हा, हाच प्रश्न ममदापूरमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने हंडा मोर्चा किंवा रास्ता रोको आंदोलनाच्या पवित्र्यात परिसरातील ग्रामस्थ आहेत.

टॅग्स :Waterपाणी