शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीचे संकट; फेरनियोजनाची शक्यता

By admin | Updated: July 3, 2016 00:39 IST

पाणीकपातीचे संकट; फेरनियोजनाची शक्यता

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा १५ टक्के पाणीसाठा उरला असून, त्यातही महापालिकेचा आरक्षित पाणीसाठा अवघा २० ते २२ दिवस पुरेल इतकाच असल्याने प्रशासनाकडून पाणीकपातीसंदर्भात फेरनियोजनाचा विचार सुरू असून, पुढील आठवड्यात त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. फेरनियोजनात शहराला आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाण्याची चर्चा आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९१७ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेचे गंगापूर आणि दारणा धरण मिळून ३३८ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. त्यात दारणा धरणातून पाणी उचलणे शक्य नसल्याने शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनीही दारणातून उपसा थांबविण्याचे आदेश दिले असल्याने महापालिकेची सारी भिस्त गंगापूर धरणावरच आहे. दारणातील १३४ दलघफू आरक्षण शिल्लक आहे. तर गंगापूरमधून अवघे २०४ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. त्यामुळे प्रतिदिन १० दलघफू पाण्याची उचल लक्षात घेता अवघे वीस दिवस पुरेल इतके पाणी आरक्षण शिल्लक आहे. सदर पाणी २० ते २२ जुलैपर्यंत पुरवता येईल, परंतु पुढे उर्वरित पाण्यातून उपसा करावा लागणार आहे. त्यासाठी शासनाची परवानगी लागणार आहे. तत्पूर्वी, आहे ते आरक्षित पाणी ३१ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी मनपाने पाणीकपातीसंबंधी फेरनियोजनाचा विचार सुरू केला आहे. शहरात जून महिन्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली तर गेल्या दोन दिवसांपासून केवळ रिमझिम स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरावर जलसंकट घोंघावत आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातील बचतीकरिता आठवड्यातील दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत आठवड्यातील दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. (प्रतिनिधी)