शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी व्यवस्थापन; २५ टक्के तरतूद करा

By admin | Updated: January 15, 2015 00:01 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महानगरपालिकेला आदेश

नाशिक : महापालिकेमार्फत सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रांमध्ये सोडले जात असल्याने पर्यावरणाची हानी होत असून, महापालिकेने परिपूर्ण सांडपाणी व्यवस्थापन आणि नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक वर्षी एकूण भांडवली खर्चापैकी २५ टक्के तरतूद करण्याची सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाशिक महापालिकेला केली आहे. याबाबत स्थायी समिती व महासभेची मान्यता घेऊन पूर्तता अहवाल सादर करण्याचे आदेशही मंडळाने दिले आहेत. दरम्यान, येत्या महासभेवर सदरचा प्रस्ताव प्रशासनामार्फत ठेवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणारे घरगुती सांडपाणी गोळा करून व त्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि तसे संमतीपत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेणे बंधनकारक आहे. याचबरोबर घनकचऱ्याबाबतही योग्य ती व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र नाशिक महापालिकेने संपूर्ण सांडपाण्याचे संकलन व प्रक्रिया करण्याकरिता परिपूर्ण योजना आजतागायत कार्यान्वित केली नसल्याने सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडून दिले जात आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व सांडपाणी एकत्र करून त्यावर योग्य ती प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा बसवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी तसेच घनकचऱ्याबाबतही योग्य विल्हेवाट लावावी. यासाठी महापालिकेने एकूण भांडवली खर्चात २५ टक्के तरतूद करून ते या प्रकल्पावर खर्च करावे व कायदेशीर पूर्तता पार पाडावी, अशी सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने २५ टक्के तरतूद करण्यासंबंधीचा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवला असून, महासभा व स्थायी समितीच्या मान्यतेनंतर तसा अहवाल मंडळाला सादर केला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)