शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याचा इशारा देणारे ‘सायरन’ वाजले...

By admin | Updated: November 18, 2016 00:34 IST

‘नासंद’कडून चाचणी : भारत-पाक सीमेवरील तणाव; सायरन व्यवस्था अद्ययावत करण्यास प्रारंभ

 अझहर शेख नाशिकवेळ दहा वाजेची. नाशिककर दैनंदिन कामांसाठी रस्त्यावर आलेले असताना अचानकपणे शहरात ‘सायरन’चा आवाज सुरू होतो. दोन मिनिटांपर्यंत शहराच्या विविध भागांमध्ये ऐकू येणाऱ्या आवाजाने नाशिककर अवाक् झाले. शहराच्या सुरक्षा व्यवस्थेला काही धोका निर्माण झाला की काय, अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली.एखाद्या शहराला धोका निर्माण झाल्याची पूर्वसूचना मिळाल्यानंतर त्या शहराला सावधानतेचा इशारा देण्यासाठी विविध मोठ्या शहरांमध्ये शासनाच्या वतीने चार अश्वशक्तीचे सायरन विविध ठिकाणी बसविण्यात आले आहे. नाशिकमध्ये अकरा ठिकाणी भोंगे बसविण्यात आले आहेत. या अकरा भोंग्यांची आज नागरी संरक्षण दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तपासणी करून चाचणी घेतली. अकरा भोंग्यांपैकी आठ भोंगे सुस्थितीत असल्याचे आढळून आले असून, उर्वरित भोंग्यांची तातडीने देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.भारत-पाक सीमेवर सर्जिकल स्ट्राइकनंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाच्या शहरांमधील ‘सायरन सिस्टम’ अद्ययावत करण्याचे आदेश केंद्राने विविध राज्यांना दिल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तत्काळ नागरी संरक्षण दलाला याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार गुरुवारी नागरी संरक्षण दलाने भोंग्याची अवस्था तपासण्यासाठी पावले उचलत विविध अकरा ठिकाणी भेटी दिल्या. भोंग्यांची तपासणी करून चाचणी घेण्यात आली. दोन मिनिटांपर्यंत भोंगा वाजवून त्याचा आवाज व क्षमता तपासण्यात आली. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक हे अत्यंत महत्त्वाचे शहर असून, या शहरामध्ये संरक्षण, चलन मुद्रणाशी संबंधित यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे तत्काळ ‘अलर्ट सायरन’ची तपासणी करून चाचणी घेतली गेली. (प्रतिनिधी)