शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बोगदा खुला होण्याची नागरिकांना प्रतीक्षा

By admin | Updated: January 12, 2016 23:11 IST

अपेक्षा : प्रजासत्ताक दिनी व्हावा निर्णय

 इंदिरानगर : गोविंदनगरकडे जाणारा बोगदा बंद असल्याने परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असताना प्रजासत्ताक दिनी तरी बोगद्यातून जाण्या-येण्याचे स्वातंत्र्य मिळेल का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक व वाहनधारक ांनी उपस्थित केला आहे. इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणारा बोगदा सुमारे सात महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अचानक बंद करण्यात आला. यासंबधी पोलीस प्रशासनाकडून परिसरातील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नसताना ही कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह सामाजिक संस्था, राजकीय नेते मंडळींकडून कार्यवाहीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. बोगद्याच्या प्रश्नावर नागरिकांमध्ये असलेल्या तीव्र भावना लक्षात घेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आंदोलनही केले. मात्र पोलीस प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत सामाजिक व राजकीय संघटनांनी केलेली आंदोलनांची कोणतीही दखल घेतली गेली नाही. इंदिरानगर परिसरातील हजारोंच्या संख्येने असलेल्या वाहनधारकांना पोलीस प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाचा फटका बसत आहे. वाहनधारकांना सुमारे तीन कि.मी. अंतराचे वळण घेऊन लेखानगर समोरील बोगद्यातून ये-जा करावी लागत आहे, तर जॉगिंग ट्रॅकच्या समांतर रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे, परंतु समोरून येणाऱ्या वाहनधारकांचा हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी असल्याचा समज होतो. त्यामुळे त्यांच्याकडून दुहेरी रस्त्यावरील वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून, परिसरात अनेक लहान-मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.इंदिरानगरक डून गोविंदनगरकडे जाण्यासाठी बोगदा सुरू करावा, अशी मागणी होत असून त्यामुळे वाहनधारकांची होणारी गैरसोय कमी होणार आहे. बोगदा बंद असल्याने इंदिरानगरवासीयांची मोठी अडचण होत असल्याने प्रजासत्ताक दिनी तरी बोगदा सुरू करून परिसरातील नागरिकांना आनंदाची बातमी द्यावी, अशी मागणी होत आहे.