मालेगाव : निमगाव वीज उपकेंद्र येथे मोठ्या प्रमाणात दुरुस्ती काम असल्यामुळे त्यावर आधारित नांदगाव ५६ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली आहे. नांदगाव ५६ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत नांदगाव तसेच मालेगाव तालुक्यातील ३९ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु निमगाव वीजउपकेंद्र येथून साकोरी व घोडेगाव पंपिंग केंद्रास उच्चदाबाचा विद्युत पुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या शनिवारपासून विद्युत पुरवठा सुरळीत नाही. त्यामुळे संबंधित लाभधारकांना नियमित पाणीपुरवठा होवू शकत नाही. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी निमगाव वीज उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात दुरुस्ती काम असल्याचे सांगितले. तसेच वरिष्ठ खात्याकडून दुरुस्तीचे साहित्य मिळाल्यावरच दुरुस्तीचे काम करुन विद्युत पुरवठा सुरळीत होवू शकतो, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावरच पाणीपुरवठा करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे पाणी व्यवस्थापन देखभाल व दुरुस्ती पथकाच्या उपविभागीय अभियंत्यांनी पत्रकाद्वारे केले आहे. (वार्ताहर)
वीजकेंद्र नादुरूस्त नांदगाव पाणीयोजना विस्कळीत
By admin | Updated: September 30, 2014 23:11 IST
वीजकेंद्र नादुरूस्त नांदगाव पाणीयोजना विस्कळीत
वीजकेंद्र नादुरूस्त नांदगाव पाणीयोजना विस्कळीत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}