शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीची अर्हता निश्चित

By admin | Updated: September 30, 2016 02:04 IST

पदवीधर मतदारसंघ : ४00 नोंदणी केंद्रांवर नावनोंदणीची व्यवस्था

नाशिकरोड : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदारयादी तयार करण्याच्या कार्यक्रमाची घोषणा विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी केली. या मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०१६ ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली असून, नाशिक विभागात एकूण ४०० मतदार नोंदणी केंद्रावर पदवीधरांना नावनोंदणी करता येणार आहे.नाशिक पदवीधर मतदारसंघाचे सदस्य डॉ. सुधीर तांबे यांचा कालावधी येत्या ५ डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारयादी तयर केली जाणार आहे. ज्या पदवीधरांकडे १ नोव्हेंबर २०१६ रोजी तीन वर्षांपूर्वी प्राप्त केलेले कोणत्याही विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र आहे, असे पदवीधर मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आपला अर्ज दाखल करू शकणार आहेत. यापूर्वीच्या मतदारयादीत नावे असलेल्या पदवीधर मतदारांनाही पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागणार आहे. याकरिता येत्या १ आॅक्टोबरपासून विभागात सर्वत्र मतदार नोंदणी सुरू होणार आहे. मतदार नावनोंदणीसाठी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांना सहायक मतदान नावनोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर ३५ जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी सहायक मतदारनोंदणी अधिकारी असणार आहेत. याशिवाय विभागातील ७० तहसीलदार दर्जाचे पदनिर्देशित अधिकारी आणि ३५७ मंडळ अधिकारी यांची याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. एक गठ्ठा प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी सांगितले. मात्र कुटुंब प्रमुखाला त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे एखाद्या आस्थापना प्रमुखांना त्यांच्या आस्थापनेवरील सर्व पदवीधर कर्मचाऱ्यांचे अर्ज मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यास मुभा देण्यात आली आहे. विभागातील सर्व जिल्हाधिकारी मंडळ, अधिकारी, तहसीलदार व विभागीय आयुक्त कार्यालयात मतदान नोंदणी अर्ज स्वीकारण्याची सोय केली असून, पदवीधरांनी आपले मतदार नोंदणी अर्ज ५ आॅक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन डवले यांनी केले आहे. यावेळी प्रशासन उपायुक्त ज्ञानेश्वर खिलारी, तहसीलदार श्रीमती एस. डी. मोहिते, माहिती उपसंचालक सतीश लळित, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)