विंचूरच्या माजी सरपंचाचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:57 IST2018-06-03T00:57:13+5:302018-06-03T00:57:13+5:30

विंचूर : हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णाला बघण्यासाठी जात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारला अपघात होऊन येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच शकुंतला रत्नाकर दरेकर या जागीच ठार झाल्या, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

Vinchur's former sarpancha died in accident | विंचूरच्या माजी सरपंचाचा अपघातात मृत्यू

विंचूरच्या माजी सरपंचाचा अपघातात मृत्यू

ठळक मुद्दे स्विफ्ट डिझायर कारला अपघात मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

विंचूर : हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णाला बघण्यासाठी जात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारला अपघात होऊन येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच शकुंतला रत्नाकर दरेकर या जागीच ठार झाल्या, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शुक्र वारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एरंडगाव शिवारात हा अपघात झाला. दरेकर यांच्या निधनामुळे शनिवारी गावात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.
येथील माजी सरपंच शकुंतला दरेकर व त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर, वाहनचालक मोरे येवल्याकडे जात असताना एरंडगाव शिवारात चालकाचा ताबा सुटल्याने स्विफ्ट कारने ( एमएच ०४ एडी ४१८२) डिव्हायडरला धडक देऊन दोन-तीन पलटी घेतल्या. यात शकुंतला दरेकर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Vinchur's former sarpancha died in accident

टॅग्स :Accidentअपघात