शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विस्कळीत वीजपुरवठ्याने पास्ते येथील ग्रामस्थ हैराण

By admin | Updated: July 30, 2014 00:20 IST

विस्कळीत वीजपुरवठ्याने पास्ते येथील ग्रामस्थ हैराण

सिन्नर : तालुक्यातील पास्ते परिसरातील वीजपुरवठा सातत्याने विस्कळीत होत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी हैराण झाले आहेत. वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.वीजपुरवठ्याअभावी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शेत शिवारातील विहिरींना थ्रीफेज वीजपुरवठा होत नसल्याने माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे. या भागातील बहुतांश शेतकरी व ग्रामस्थांनी कृषिपंपांची तसेच घरगुती वीजजोडण्याची बिले भरली असतानाही वीज कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने या परिसरात असंतोष पसरला आहे. या परिसरात सोमवार, मंगळवार व बुधवारी सकाळी साडेआठ ते दुपारी चाडेचार त्यानंतर गुरुवार ते रविवार रात्री साडेअकरा ते सकाळी साडेसात अशी भारनियमनाची वेळ आहे. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून भारनियमनाव्यतिरिक्तही वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तसेच असे भारनियमन सुरू आहे. येत्या सात दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने वीज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असून, त्यावर भाजयुमोचे माजी तालुकाध्यक्ष नेताजी काकड, वसंत आव्हाड, एल. एम. आव्हाड आदिंसह ग्रामस्थांची नावे आहेत. (वार्ताहर)