शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला वाहनांची तोडफोडां

By admin | Updated: August 18, 2016 00:28 IST

प् धरा गाड्यांचे नुकसान : समाजकंटकांचे कृत्य; दहशत माजविण्याचा प्रकार; गुन्हा दाखल

सातपूर : सातपूर कॉलनी परिसरातील १० ते १५ चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न अज्ञात समाजकंटकांनी मंगळवारी (दि़ १६) मध्यरात्रीच्या सुमारास केला़ या घटनेमुळे परिसरात दहशत आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना सातपूर कॉलनीत सुयोग हॉस्पिटल ते मनाज वाईन ते उद्योग भवन, शिवनेरी उद्यान, साईबाबा मंदिर आदि परिसरातील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ११ चारचाकी वाहनांच्या काचा अज्ञात समाजकंटकांनी फोडून वाहनांचे नुकसान केले. अजूनही काही वाहनांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यातील एका वाहनात चालक झोपलेला होता. या प्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सातपूर कॉलनी परिसरात एकाच वेळी अनेक वाहनांचे समाजकंटकांकडून नुकसान होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे. या समाजकंटकांच्या कृत्याविषयी दिवसभर अनेक चर्चा आणि अफवा सुरू होत्या. परंतु कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यात आली.नागरिकांनी संयम दाखवित पोलिसांना सहकार्य केले या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त ठाकूर, पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांनी भेट देऊन माहिती घेतली, तर पोलिसांनी सर्व वाहनांचे रीतसर पंचनामे केले आहेत. तसेच आमदार सीमा हिरे, स्थायी सभापती सलीम शेख, नगरसेवक उषा शेळके यांनीही भेट दिली. (वार्ताहर)