दिंडोरीरोड येथे भरणारा अनधिकृत भाजीबाजार सोमवारी सायंकाळी अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात हटविला. पथकाला भाजीविक्रेत्यांनी कडाडून विरोध केला. मात्र पोलिसांपुढे त्यांना नमते घ्यावे लागले. वाहतुकीला अडथळा होत असल्याने पंचवटी पोलिसांनी याबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. या कारवाईतील जप्त भाजीपाला अनाथाश्रमाला दिला जाणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}