शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांची आवक वाढली दरात घसरण

By admin | Updated: September 4, 2014 00:44 IST

पालेभाज्यांची आवक वाढली दरात घसरण

 पंचवटी : गेल्या पंधरवड्यापासून पाऊस कोसळत असल्याने पालेभाज्यांची आवक वाढली असून, दरात घसरण झाली आहे. सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांची आवक वाढत चालल्याने व त्या तुलनेत मागणी नसल्याने दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी बाजार समितीत शेतकऱ्यांनी कोथिंबीर माल विक्रीसाठी आणला; मात्र कोथिंबीर ओली असल्याने कोणीही खरेदी केली नाही. परिणामी शेतकऱ्यांना बाजार समितीत उघड्यावर जनावरांसाठी कोथिंबीर फेकून द्यावी लागली. बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांची साठ ते सत्तर टक्के आवक वाढली आहे. शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे व त्यातच पीक लागवडीचा खर्च व दळणवळण भाडेही सुटत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे शेतमालाची आवक वाढली, तर दुसरीकडे पाऊस सुरू असल्याने शेतमाल ओला होऊन नाशवंत होत आहेच शिवाय परराज्यातील बाजारपेठेत स्थानिक शेतमाल वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण होत असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. बाजार समितीत सध्या कोथिंबीर ३ रुपये, शेपू ३, मेथी ३, पालक २, तर कांदापात ८ रुपये प्रति जुडी दराने मिळत आहे. (वार्ताहर)