वरदडीला प्राचीन शनिमंदिरात अमावास्येला भाविकांची गर्दी

By Admin | Updated: July 28, 2014 00:51 IST2014-07-27T23:19:53+5:302014-07-28T00:51:03+5:30

वरदडीला प्राचीन शनिमंदिरात अमावास्येला भाविकांची गर्दी

Varadhi a crowd of devotees to Amavasya in ancient Shani Mandir | वरदडीला प्राचीन शनिमंदिरात अमावास्येला भाविकांची गर्दी

वरदडीला प्राचीन शनिमंदिरात अमावास्येला भाविकांची गर्दी

चांदवड : तालुक्यातील प्राचीन शनिमंदिर वरदडी, उसवाड येथे भाविकांनी शनि अमावास्येला गर्दी केली होती, तर दर्शनासाठी दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
उसवाडपासून तीन किमी अंतरावर व राहुडपासून दोन किलोमीटर अंतरावर प्राचीन वरदडी शनिमंदिर प्रसिद्ध आहे. येथे शनि महात्म्यमधील आख्यायिकेनुसार विक्रम राजाचा घोडा येथे उतरला होता. आजही येथे घोड्याच्या टापा खडकावर दिसून येतात. येथील शनिमंदिरात शनि अमावास्या व दीप अमावास्येला मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. तर या मंदिराचा कारभार ट्रस्टच्या ताब्यात आल्याने ट्रस्टने विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सकाळपासून या मंदिरात पाच- पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या, तर खान्देश व उत्तर महाराष्ट्रातील अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. शनि अमावास्येला या मंदिरात कीर्तन व भजनाचा कार्यक्रम व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. परिसरात यात्रेचे स्वरुप आले होते. अनेक दुकाने थाटली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रस्टने वाहने मंदिरावर वरील डोंगरावरच लावली होती. चांदवड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. दरम्यान, चांदवड शहरातील पुरातन शनिमंदिर व कार्तिकेश्वर मंदिरात शनि अमावास्येनिमित्त असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला, तर यामंदिरात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. पुरोहित अंबादास दीक्षित व प्रदीप उपासनी यांनी भविकांना सेवा दिली.
( वार्ताहर)

Web Title: Varadhi a crowd of devotees to Amavasya in ancient Shani Mandir