शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईकडून गरब्याचा सराव

By admin | Updated: September 29, 2016 00:19 IST

वेध नवरात्रीचे : गरब्याचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळांना गर्दी

नाशिक : चार दिवसांवर नवरात्रोत्सवाचा सण येऊन ठेपला असून, तरुणाईला गरब्याचे वेध लागले आहे. शहरात विविध भागांमध्ये गरब्याचे क्लास रंगात येत असून, सरावावर तरुण-तरुणी भर देत आहेत.नवरात्रोत्सवामध्ये दांडिया रास आणि गरबा हे नृत्यप्रकार लोकप्रिय आहेत. कॉलेजरोड, गंगापूररोड, हिरावाडी, पंचवटी, आडगाव नाका, इंदिरानगर, अशोकामार्ग, उपनगर या भागांमध्ये गरबाचे खासगी वर्ग सुरू झाले आहेत. गरबा हा जसा तरुणींमध्ये प्रसिद्ध आहे तसा तरुणांमध्येही आहे. गुजराथी, राजस्थानी, जैन बांधव शहरात नवरात्रोत्सवामध्ये गरब्याचे आयोजन करतात. सालाबादप्रमाणे दिंडोरी नाका येथील कच्छी लोहाना महाजनवाडीमध्ये यंदाही सामूहिक गरबा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत शहरातील विविध भागांमधील गुजराथी तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होतात.गरब्यासाठी लागणारा पोशाखही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तरुणदेखील पारंपरिक पोषाख म्हणून केडियूला प्राधान्य देत आहेत. गुजरात, राजस्थान या राज्यांमधील लोकनृत्य म्हणून गरबा ओळखला जातो. नवरात्रोत्सवाचे खास आकर्षण म्हणून दांडिया रास व गरबा या सांस्कृतिक कार्यक्रमांची ओळख आहे.शहरात गरब्याची कार्यशाळा ठिकठिकाणी गेल्या आठवडाभरापासून सुरू असून, येत्या तीन दिवसांमध्ये कार्यशाळांचा समारोप होणार आहे. वर्षातून एकादाच हा नृत्यप्रकार तरुणाईकडून केला जात असल्याने कार्यशाळांमध्ये पंधरा ते पंचवीस वयोगटातील तरुण-तरुणींची गर्दी होत आहे. तसेच बहुतांश कार्यशाळांमध्ये महिलांनीही सहभाग नोंदविला आहे.